बीड : गेल्या काही दिवसांपासून सर्दी ,पडसे, खोकला, ताप इ.
लक्षणे असलेल्या रूग्णांची संख्या वाढू लागली असून, नागरीकांनी काळजी घ्यावी. सरकारी दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावेत,
घाबरून जाऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागा कडून करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात काही ठिकाणी एचएमपीव्ही विषाणू संसर्ग आजाराची लक्षणे दिसून आल्याने, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, या आजाराला भिण्याचे कारण नाही. अजिबात घाबरू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका. काळजी घ्या.
सावध होऊन, आजाराचा सामना करा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. श्वसनाचा संसर्ग होऊ शकेल अशी लक्षणे असलेला हा आजार महाराष्ट्रात येऊ पाहतोय. काही ठिकाणी रूग्ण आढळले आहेत. सर्दी, खोकला, तापाची लक्षणे आढळल्यास काळजी घ्यायची आहे. मास्क वापरा, नजीकच्या सरकारी दवाखान्यात जा आणि उपचार घ्या. घरीच आराम करा. चांगले हात धुवून मगच जेवायला बसा. सार्वजनिक ठिकाणी जाताना काळजी घ्या.
सध्या, थंडीचे दिवस आहेत. पौष्टिक आहार घ्या, दररोज सकाळी थोडा थोडा व्यायाम करा. भरपूर पाणी प्या.गेल्या आठवडय़ात [ जानेवारीपासून 2025 ] थंडीची लाट निर्माण झाली असून, दिवसा कडक ऊन पडत आहे. थंडी , ऊन आणि त्यातून निर्माण झालेले व्हायरल इन्फेक्शन आजाराची साथ निर्माण करत आहे. त्यामुळे, न घाबरता काळजी घ्यायची गरज आहे. आजाराची लक्षणे आढळल्यास ताबडतोब नजीकच्या दवाखान्यात जाऊन डाॅक्टरांचा सल्ला घेऊन, औषधोपचार करायचा आहे. सरकारी दवाखान्यात गोरगरीब समाजातील सर्व नागरीकांना मोफत उपचार केले जात आहेत. या आधी दहा रू नाममात्र शुल्क आकारण्यात येत होते. आता, मोफत नोंदणी करून उपचार केले जात आहेत. सामान्य रूग्ण, गरोदर मातांच्या तपासण्या मोफत केल्या जातात. जवळपास अनेक आजारावर या चाचण्यांचा उपयोग होत असून, योग्य आणि वेळेवर उपचार करून घेता येत आहेत.दरम्यान, बीड जिल्ह्य़ात गेल्या काही दिवसांपासून सर्दी ,पडसे, खोकला, ताप इ. लक्षणे असलेल्या रूग्णांची संख्या वाढू लागली असून, नागरीकांनी काळजी घ्यावी. सरकारी दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावेत,
घाबरून जाऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागा कडून करण्यात आले आहे.