बीड : येथील सामाजिक कार्यकर्ते धोंडिबा हातागळे कर्मवीर एकनाथ आवाड समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हातागळे यांचा गौरव करण्यात आल्याने, बीड जिल्ह्य़ातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
दि. ९. मंगळवार रोजी मुंबई येथे धोंडिबा हातागळे कर्मवीर एकनाथ आवाड समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार कर्मवीर एकनाथ आवाड यांनी हजारो एकर गायरान जमिनी दिन दलित आदिवासी बहुजन यांच्या नावे करून दिल्या आहेत. कर्मवीर एकनाथ आवाड यांचे कार्य सर्व घटकांमध्ये होते. एकनाथ आव्हाड यांनी हजारो कार्यकर्ते गावागावांमध्ये तयार केलेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करत आहेत. अशाच कार्यकर्त्यांना या पुरस्काराचा मानकरी म्हणून कर्मवीर एकनाथ आवाड समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. मानवी हक्क अभियानाचे तालुका अध्यक्ष धोंडीबा हातागळे यांचे कार्याची दखल घेऊन, त्यांना कर्मवीर एकनाथ आवाड समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.