मुंबई : इयत्या दहावी आणि बारावी च्या वार्षिक लेखी परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात येणार असून, शिक्षण विभागाने आदेश जारी केला आहे. दरम्यान, परीक्षा केंद्रावर कॅमेरा बसविण्यात आल्यावर काॅपी बहाद्दरांना लगाम लागणार आहे.
दहावी-बारावीची वार्षिक लेखी परीक्षा अनुक्रमे फेब्रुवारी – मार्च महिन्यात [ 2025 ] होणार आहेत. बोर्डा कडून अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले असून, पहिल्या पेपर पासून प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही बसविण्यात यावेत, असा आदेश राज्य शिक्षण मंडळाने जारी केला आहे. दरम्यान, लेखी परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांवर शिक्षक आणि आता कॅमेरा नजर ठेवणार आहे. तसे झाल्यास, काॅपी बहाद्दरांना धडकी भरणार आहे. काही ठिकाणी काॅपी करण्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे, हुशार विद्यार्थ्यांवर दडपण येऊन, ते डिस्टर्ब होण्याची तक्रार पालकांकडून केली जात होती. पोलीसांचा पहारा असून ही, काॅपी चे प्रमाण कमी होत नव्हते.
मात्र, कॅमेरे कोणी खरेदी करायचे आणि बसवायचे या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आलेले नाही.