दिल्ली, : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यासाठी काही महिन्यांचा अवधी आहे. मात्र, त्याआधीच दिल्लीचं मैदान मारण्यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. आम आदमी पक्षाने सलग तिसèयांदा दिल्लीची सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर, दुसरीकडे भाजपनेदेखील कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपला चेकमेट देत केजरीवालांनी एका याेजनेवरून आव्हान दिले आहे.
आपच्या याेजनेला खाेडा
काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाने महिलांसाठी लाडकी बहीण याेजनेच्या धर्तीवर महिला सन्मान याेजनेची घाेषणा केली हाेती. या याेजनेनुसार दिल्लीतील महिलांना 2100 रुपये मिळणार हाेते. मात्र, भाजपने आक्षेप घेत याेजना थांबवण्याचा प्रयत्न केला. आता केजरीवाल यांनी हिंदू कार्ड खेळत भाजपला उलट आव्हान दिले आहे.
केजरीवालांचं हिंदू कार्ड
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी माेठी घाेषणा केली. आज पत्रकार परिषदेत दिल्लीत आम आदमी पार्टीचे पुन्हा सरकार आल्यास पुजारी आणि पुराेहितांनाही दरमहा 18 हजार रुपये मानधन दिले जाणार असल्याची घाेषणा केली. या याेजनेनुसार, दिल्लीत पुजारी, पुराेहितांची नाेंदणी करण्यात येणार आहे.आपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वत: मंगळवारपासून कॅनाॅट प्लेस येथील हनुमान मंदिरातून नाेंदणी माेहीम सुरू करणार आहेत. अरविंद केजरीवाल यांनी भाजपला हे आव्हान देऊन त्यांच्याच हिंदुत्वाच्या मैदानावर काेंडी केली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याआधी केजरीवाल यांच्या याेजनांना विराेध करणाèया भाजपने या याेजनेलाही विराेध केल्यास भाजप हिंदूविराेधी असल्याचा मुद्दा आपला करता येईल.