पुणे : दैवीशक्ती प्राप्त झाल्याची बतावणी करुन एका भाेंदूने महिलेवर चाकुच्या धाकाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पाेलिसांनी भाेंदूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका महिलेने बिबवेवाडी पाेलीस ठाण्यात िफर्याद दिली आहे. तिने दिलेल्या िफर्यादीनुसार, आराेपीविरुद्ध बलात्कार, तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेला जाळ्यात ओढले
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आराेपी आणि महिलेची ओळख हाेती. दैवीशक्ती अवगत आहे, तसेच माझ्या अंगात संचार हाेताे, असे सांगून भाेंदूने महिलेला जाळ्यात ओढले. त्यानंतर आराेपी महिलेच्या घरी आला. महिला आणि तिची दाेन मुले घरात हाेते. भाेंदूने महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना नुकतीच घडली. घाबरलेल्या महिलेने पाेलिसांकडे तक्रार दिली. सहायक पाेलीस निरीक्षक सावंत तपास करत आहेत.