भाषा संरक्षण क्षेत्रातील योगदानाची राष्ट्रीय पातळीवर दखल
नाशिक – मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या, कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयाच्या हिंदी विभाग प्रमुख डॉ. दीपा दत्तात्रय कुचेकर यांना मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
भाषा संरक्षणाच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत मध्यप्रदेशचे राज्यपाल श्री. पटेल यांच्या हस्ते भारतीय प्रजासत्ताक दिनी डॉ. कुचेकर यांचा गौरव करण्यात आला.
भोपाळ येथील रवींद्र भवनमध्ये पार पडलेल्या या सोहळ्याप्रसंगी मध्यप्रदेश शासन संस्कृतिक विभाग मुख्य सचिव शिवशेखर शुक्ला, जनजातीय लोक कला एवं बोली विकास अकादमीचे निर्देशक डॉ. धर्मेंद्र पारे, भाषा वैज्ञानिक डॉ. कविता रस्तोगी यांची उपस्थिती होती. डॉ. कुचेकर यांनी
मध्यप्रदेश शासनाच्या सांस्कृतिक विभागांतर्गत जनजातीय लोक कला व बोली विकास अकादमी, भोपाळ यांनी पारधी, कुचबंदीया, बेडिया, बंजारा आणि गाडुलिया लोहार, या पाच भटक्या समुदायांच्या लोप पावत चाललेल्या भाषांचे संरक्षण करण्यासाठी टॉकिंग डिक्शनरी आणि आईपीए प्रणालीचे अंकन करण्याचा उपक्रम हाती घेतला होता. हे कार्य सेल संस्था, लखनऊ यांच्या सहकार्याने राबविण्यात आले. बंजारा भाषा संकलनात डॉ. दीपा कुचेकर (महाराष्ट्र) यांच्यासह डॉ. सीमा सूर्यवंशी (छिंदवाडा), डॉ. संगीता सिंग (ग्वालियर), खेमराज आर्य (मध्यप्रदेश) यांनी योगदान दिले आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात बंजारा भाषेच्या शब्द संकलन आणि दस्तऐवजीकरणाच्या कार्यात डॉ. दीपा कुचेकर यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या संशोधनातून आणि प्रयत्नांमधून बंजारा भाषेची जतन प्रक्रिया सुलभ झाली असून, या भाषेच्या अस्तित्वासाठी एक मजबूत पायाभरणी झाली आहे.
या सन्मानामुळे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या शैक्षणिक योगदानाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. डॉ. कुचेकर यांच्या योगदानाबद्दल मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, निफाड तालुका संचालक शिवाजी गडाख, महिला संचालक शोभाताई बोरस्ते, मविप्र शिक्षणाधिकारी प्रा. डॉ. नितीन जाधव, स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र मोरे, सुनील पाटील, प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे, उपप्राचार्य दिलीप माळोदे, आयक्यूएसी समन्वयक भगवान कडलग, नॅक समन्वयक डॉ. एन. यू. पाटील यांच्यासह शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.