बीड – गेवराई
पंतप्रधान आवास योजनेचे गेवराई तालुक्याला प्रपत्र ड यादीचे उद्दीष्ट प्राप्त झालेले आहे मात्र अनेक गावात अल्पसंख्याक समाज तुरळक व गरीब, बेघर आहे असे असतानाही एस. सी.,एसटी,नंतर इतर व त्यानंतर अल्पसंख्यांक अशी प्रतीक्षा यादी तयार करण्यात आलेली आहे, तालुक्यात अल्पसंख्यांक समाज संखेने कमी असतानाही इतरांची प्रतीक्षा यादि संपल्यानंतरच अल्पसंख्यांक यांना घरकुल देण्याचा घाट प्रशासनाच्या वतीने होत असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला, शासनाच्या धोरनाचा या समाजाला फटका सहन करावा लागत आहे, मादळमोही, उमापूर, तलवाडा, धोंडराई, भाटअंतरवली, ब्रम्हगाव, चकलांबा, रसुलाबाद, हिवरवाडी, जातेगाव, धोंडराई सह अनेक गावात इतर प्रवर्गाची यादि मोठी असतानाही अल्पसंख्यांक समाजाला प्रतिक्षाच करावी लागत आहे. सध्या इतर प्रवर्गाचे उद्दिष्ट गेवराई पंचायत समितीला प्राप्त झाले आहे मात्र अल्पसंख्यांक समाजाला वेगळे उद्दिष्ट येणार असल्याचे कारणे पूढे करून हेतुपूरस्सर डावलण्याचा घाट असल्याचा आरोप यावेळी गेवराई तालुक्यातील विविध गावातील अल्पसंख्याक समाजातील सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्याकडून करण्यात आला यावेळी आ.विजयसिंह पंडित व गटविकास अधिकारी गेवराई यांना निवेदन ही देण्यात आले.
प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या ‘ड’ सर्वेक्षणात अल्पसंख्यांक समाजाची प्रतिक्षा यादी वेगळी करण्यात आलेली आहे, इतर लाभाच्या योजनेत असा प्रकार होत नाही मात्र पंतप्रधान घरकुल योजनेत अल्पसंख्याक समाजाला हेतुपुरस्सर डावलण्याचा प्रयत्न यातून दिसून येत आहे, गेवराई तालुक्यातील अल्पसंख्यांक समाजातील सरपंच,उपसरपंच, सदस्य यांनी काल शुक्रवार रोजी गेवराई पंचायत समितीत आ.विजयसिंह पंडीत यांच्यासह गटविकास अधिकारी गेवराई यांना भेटून निवेदन सादर केले यावेळी भाटअंतरवलीचे सरपंच माजेद शेख, मादळमोही चे ग्रा.पं.सदस्य आदिल पठाण, उमापूर ग्रा पं सदस्य अझहर इनामदार, वंचितचे ज्ञानेश्वर हवाळे, चकलंबा ग्रा पं सदस्य जुबेर शेख, महांदुला शांमद पटेल, आतिक पठाण, उपसरपंच अजजू भाई, नंदपूर फत्तू भाई, इरफान शेख, अब्दुल्ला भाई आदींनी यावेळी निवेदन सादर केले.