बीड – गेवराई
ज्ञान म्हणजे संत भगवान बाबा तर वैराग्य म्हणजे संत वामनभाऊ महाराज या संतांनी सर्व जाती धर्माला एकत्र करत वारकरी संप्रदायाची पताका तेवत ठेवली या जगात संतांची व देवाची सत्ता असून बाकी सर्व काही क्षणभंगूर आहे. भगवंताचं नाम सर्व सारभूत असल्यामुळे त्याच्याशी कुणाचीही तुलना होऊ शकत नाही. त्याला इतर कशाचीही उपमा देता येणार नाही. हे नाम आपला तर उद्धार करतंच; परंतु आपल्या पूर्वजांचाही उद्धार करतं तर गोठ्यातील गाय व घरातील माय सांभाळण्याचा सल्ला ह.भ.प. विलास महाराज गेजगे ( बोथीकर, गंगाखेड ) यांनी आपल्या कीर्तनातून व्यक्त केला.
संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षेप्रमाणे याही वर्षी दिनांक 3 फेब्रुवारी सोमवार रोजी भव्य सत्संग कीर्तन सोहळा महोत्सवाला प्रारंभ झाला सकाळच्या सुमारास विविध महाराज मंडळी त्याचा विदेशातील मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून दुपारी एक ते चार या वेळेमध्ये सुप्रसिद्ध कथाकार ह भ प प्रकाश महाराज साठे यांच्या अमृतवाणीतून शिव महापुराण कथा संपन्न झाली या शिव महापुराण कथेला महिलांच्या संख्येसह पुरुषांचीही संख्या मोठ्या प्रमाणात होती. सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध शहनाई वादक पं. कल्याणजी अपार ( पुणे ) यांचे शहनाई गुंजन कार्यक्रम कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला परिसरातील संगीत प्रेमी उपस्थित होते तर रात्री आठ वाजता ह.भ.प. विलास महाराज गेजगे ( बोथीकर, गंगाखेड ) यांचे सुश्राव्य नामपर कीर्तन संपन्न झाले या कीर्तनामध्ये जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा सारासार विचार करा उठाउठी। नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट। तराल दुर्घट भवसिंधु, जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, धरी हाचि नेम अहर्निशी, तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत। हा अभंग त्यांनी कीर्तन सेवेसाठी घेतला होता. सार आणि असार काय आहे तसेच विचार, नरदेहाचे महत्व, भागवत कथेतील दृष्टांत, भोग, त्याग, सुखदुःख, नामस्मरण, सेवाभाव, पुण्यस्मरणाचे महत्त्व अशा विविध अंगाने कीर्तनामध्ये निरुपण करून महाराजांनी पुढे आई वडिलांचे किती उपकार आपल्यावर आहेत, हे सांगून सध्या काळाची गरज आहे, ती म्हणजे आई-वडिलांची सेवा करणे, असे सांगितले. आई वडिलांची सेवा हीच परमेश्वराची सेवा आहे, याचे महत्व अनेक उदाहरणे देत समोरील भाविक श्रोत्यांना त्यांनी आपल्या कीर्तन सेवेतून मंत्रमुग्ध केले. या कीर्तन सेवेला गेवराई शहरात सह पंचक्रोशीतील भावी भक्तांचे मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
सत्संग कीर्तन सोहळ्यातील उर्वरित दैनंदिन कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत. पूर्ण सप्ताह रोज दुपारी ०१ ते ०४ सुप्रसिद्ध कथाकार ह.भ.प.प्रकाश महाराज साठे यांच्या अमृतवाणीतून शिवमहापुराण कथा असणारा असून, तर मंगळवार दि.४ फेब्रुवारी रोजी सायं ०६ वा. इंद्रजित आण्णा येवले यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम सायं. ८ वाजता. ह.भ.प. नारायण महाराज पालमकर (बाळकृष्ण महाराज संस्थान, गुरुपीठ) यांचे सुश्राव्य हरीकीर्तन तर बुधवार दि.५ फेब्रुवारी सायं ०६ वा. प्रसिद्ध भारुड सम्राट प्रभाकर महाराज कुटे यांचा भारुडाचा प्रबोधनपर कार्यक्रम सायं. ८ वाजता. ह.भ.प. कीर्तनरत्न प्रमोद महाराज जगताप (पुणे) यांचे सुश्राव्य हरीकीर्तन, गुरूवार दि.६ फेब्रुवारी रोजी सायं ०६ वा. संगित अलंकार सुरंजन जायभाये व कु. भक्ती जायभाये यांचा अभंगवाणी कार्यक्रम सायं. ८ वाजता. ह.भ.प. कीर्तनरत्न प्रशांत महाराज ताकोते (अकोला जि. बुलढाणा) यांचे सुश्राव्य हरीकीर्तन तर शुक्रवार दि.०७ फेब्रुवारी सायं ०६ वा. संगित अलंकार डॉ. तुळशीरामजी आतकरे गुरुजी यांचा अभंगनाद कार्यक्रम सायं. ८ वाजता. ह.भ.प. श्रीगुरू पुंडलिक महाराज देहुकर ( संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ) यांचे सुश्राव्य हरीकिर्तन, शनिवार दि.८ फेब्रुवारी सायं ५:३० ते ८:०० संत भगवानबाबा अध्यात्म सेवा गौरव पुरस्कार व तालुक्यातील विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान व्यक्तींच्या आईचा मानृपूजन सोहळा, सायं. ८ वाजता. ह.भ.प. कीर्तनरत्न संजय महाराज भोसले (वेळुकर,) सातारा यांचे सुश्राव्य हरीकीर्तन, रविवार दि.९ फेब्रुवारी सायं ०६ वा. संगीत अलंकार राधाकृष्णण गरड गुरूजी (श्रीक्षेत्र आळंदी देवाची) यांचा भजनसंध्या कार्यक्रम सायं. ८ वाजता. ह.भ.प. कृष्णा महाराज शास्त्री (उत्तराधिकारी श्रीक्षेत्र भगवानगड) यांचे सुश्राव्य हरीकीर्तन, सोमवार दि. १० फेब्रुवारी सकाळी ११ ते ०१ ह.भ.प. महादेव महाराज चाकरवाडीकर (श्री क्षेत्र माऊली महाराज संस्थान चाकरवाडी) यांचे सुश्राव्य काल्याचे कीर्तन व नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे तरी भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताहाचे अध्यक्ष संतोष भोसले, स्वागत अध्यक्ष परमेश्वर महाराज वाघमोडे, सचिन ढाकणे, प्रमुख मार्गदर्शक अक्रूर महाराज साखरे, उत्तम नाना मोटे, मधुकर तौर, समन्वयक माधव चाटे यांच्यासह संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.