छत्रपती संभाजीनगर :
१० हजार मेट्रीक टन महिन्याला उत्पादन असलेल्या ओयासिस ऑर्गेनिक या शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या कंपनीचे संचालक म्हणून महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या विविध संस्थांचे पद भूषवणाऱ्या आयुब पठाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल कोणत्या गोष्टीला प्राधान्य देणार या प्रश्नावर आयुब पठाण सर म्हणाले की, शहरातील सर्व मॉल्सच्या माध्यमातून जनसमान्याच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून ऑर्गेनिक भाजीपाला िवतरीत केला जाणार आहे. त्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य अबाधीत राहणार आहे. कुठल्याही रोगांना प्रतिकार करण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून प्रयत्न केले जातील खर तर शहरवासीयासाठी नव्या वर्षाच्या दृष्टीकोनातून हे सकारात्मक पाऊलच म्हटले पाहिजे असे आयुब पठाण यांनी सांगितले.

आयुब पठाण म्हणाले की, शहरात जागोजागी कचरा साचला जात आहे. लोक नाक दाबून संकटातून मार्ग काढत आहेत. मात्र या संकटावर बेस्ट बायोलॉजिकल कल्चर पावडर खरोखरच वरदान ठरणार आहे. कचरा निर्मूलन करण्यासाठी ओयासिस ऑर्गेनिक कडे बायो ऑक्सी नावाचं एक बेस्ट बायोलॉजिकल कल्चर पावडर फॉर्ममध्येआहे. या कल्चरमुळे दुसऱ्याचा येणारा दुर्गंध नष्ट होतो आणि त्या कचऱ्याचं कंपोस्ट मध्ये रूपांतर होते.
एक किलोचा पॅक मध्ये जवळजवळ आठशे ते हजार किलो कचरा निर्मूलन होऊ शकतो. म्हणजेच जवळजवळ एक टन कचरा च निर्मूलन होऊ शकतं.या पावडरचा उपयोग सार्वजनिक शौचालय नाल्या तसेच बायोलॉजिकल जो काही कचरा आहे महानगरपालिकेचा त्याचे निर्मूलन होतं.नाल्यांमध्ये येणारी दुर्गंधीही रहात नाही, तीन तासांमध्ये कितीही घाण असलेला वास कमी होतो.आणि नाल्यामध्ये खाली राहिलेला जो कचरा आहे त्याचं रूपांतर खतामध्ये होऊन नाल्याही स्वच्छ होतात.वापरण्याची पद्धत 40 लिटर पाण्यामध्ये एक किलो पावडर चांगलं ढवळून घेणे व निवडक भागावर अशाप्रकारे पसरवणे जेणेकरून संपूर्णपणे ओले झाले पाहिजे. याच्या मिश्रणाचा उपयोग शेतकरी फवारणीसाठी ही करू शकतो.
याचा घरगुती वारही चांगल्य ा प्रकारे होऊ शकतो. तुम्ही आल्या वॉर्डातील कचऱ्यावर औषध फवारणी केल्यास छान कंपोस्ट खत तयार होते या खताचा उपयोग बागेतील झाडांसाठी, परसबागेसाठीही छान पैकी करता येऊ शकतो.