बीड – गेवराई –
श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थान, कुंभेजळगाव (ता.गेवराई) येथे वै.ब्रम्हनिष्ठ गुरुवर्य महंत ह.भ.प.वामन महाराज गिरी यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमीत्त सुरु असलेल्या ५३ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची आज बुधवार दि.५ फेब्रुवारी रोजी संस्थानचे महंत ह.भ.प दत्ता महाराज गिरी यांच्या अमृततुल्य काल्याच्या किर्तनाने सांगता होणार आहे. तरी भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
या सप्ताहात महाराष्ट्रातील ख्यातनाम किर्तनकारांनी आपली सेवा देवुन किर्तन, प्रवचन, गाथा भजन, संगित तुळशी रामकथा सह अदि धार्मिक कार्यक्रम याठिकाणी झाले. यामुळे गडाचा परिसर भक्तिमय वातावरणाने फुलून गेला आहे. तर दि.५ फेब्रुवारी रोजी दुपारी १ ते ३ यावेळेत संस्थानचे महंत दत्तात्रय महाराज गिरी यांच्या अमृततुल्य काल्याच्या किर्तनाने सांगता होणार आहे. कीर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप होईल तरि भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कीर्तन श्रवणासह महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री क्षेत्र गोरक्षनाथ संस्थान, कुंभेजळगाव व पंचक्रोशीतील भाविकांनी केले आहे.