राजकीय क्षेत्रात वावरताना महाराष्ट्रात संयम असलेला एकमेव राजकारणी बापमाणुस…!
*राजकीय सामाजिक क्षेत्रात वावरताना प्रत्येक कार्यकर्त्याने डोळ्यासमोर आदर्श ठेवावा असा हा लोकनेता...!
समय बडा बलवान होता है
नुकताच काल दिनांक ०५ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री महोदयांनी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन प्रसंगी दौरा केला यावेळी ज्या मराठवाड्याच्या साधू संताच्या पावण भूमीतील काही लोकांनी मुख्यमंत्री महोदय यांच्यावर निवडणुकीच्या तोंडावर अश्लील शेरेबाजी केली टिप्पणी केली मोठमोठ्या वल्गना केल्या आम्ही देवेंद्र फडणवीस यांना मराठवाड्यात पाय ठेवू देणार नाही त्याच मराठवाड्याच्या भुमित काल त्यांचा “बाहुबली” नेता म्हणून उल्लेख झाला यांसह ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत सुध्दा झाले.
महाराष्ट्राच्या चांद्यापासुन बांद्यापर्यत विकासाची गंगा खेचून आणली “महाराष्ट्र सेवक” म्हणून काम करणाऱ्या ह्या शांत अन् संयमी माणसाच्या वाट्याला काय आलं तर नेहमी शिवीगाळ श्याप अन् सोशल मीडियावर गलिच्छ लिखाण परंतु ह्या सर्व गोष्टी कडे पुर्णपणे दुर्लक्ष करून महाराष्ट्र हा माझा परिवार आहे हे डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्राचे हित जोपासले एकीकडे अनेक कार्यकर्ते नेते छोट्या-छोट्या गोष्टींसाठी पदासाठी हमरीतुमरीवर येतात परंतु मा.देवेंद्रभाऊ फडणवीस ह्याला अपवाद आहे पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणारा म्हणूनच हा महाराष्ट्र सेवक नक्कीच भविष्यात “देशाचा सेवक होईल” आम्हा कार्यकर्त्यांना खात्री आहे.
ईतिहास हा शिव्यांना नाही कर्तृत्वाला लक्षात ठेवतो..! देवेंद्रभाऊ फडणवीस म्हणजे सुडाची भावना नसणारा लोकनेता आहे..!
क्षेत्र राजकीय असो कि सामाजिक टिका टिप्पणी असभ्य भाषेत विधान केल्यावर याचा रिझल्ट वेगवेगळ्या पध्दतीने लागतोच परंतु मा.देवेंद्रभाऊ यांच्यावर सातत्याने अश्लील शेरेबाजी टिप्पणी करुन सुध्दा त्यांनी संबंधितांना माफ केले एका राजकीय सभेच्या वेळी त्यांनी भाषणात सांगितले होते “मि राजकारणीच नाही मला राजकारणातील छक्के पंजे कळत नाही मि कोणाच्याही वाटेला जात नाही कोणालाही त्रास देत नाही परंतु माझा ज्यांनी विश्वासात केला ईश्वर त्यांचा सत्यानाश करतो” अन् झालेही असेच २०१९ मध्ये हाती आलेल मुख्यमंत्री पद विश्वासघात करून घेतलं परंतु मुख्यमंत्री पदावरून पायउतार होऊन उपमुख्यमंत्री पद स्वीकारले परंतु २०२४ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अगदी मतदान होण्याच्या एक दिवस अगोदर सुध्दा विरोधकांनी हिणवल अश्लिल टिका केली हेच काय आई-पत्नीवर सुध्दा शिवीगाळ केली अनेकांनी अनेक व्युहरचना रचत त्यांचा “अभिमन्यू” करण्याचा प्रयत्न केला परंतु तरीही हा लोकनेता शांतच हिच बाब महाराष्ट्रातील सुज्ञ व जागरुक मतदारांना खटकली व विधानसभा निवडणुकीत जनतेने पुन्हा एकदा बहुमताने मुख्यमंत्री पदी त्यांना विराजमान केलं ना.देवेंद्रभाऊ यांनी त्यांच्या एका भाषणात उल्लेखही केला होता ईतिहास हा शिव्यांना नाही कर्तृत्वाला लक्षात ठेवतो..!
राज्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारा महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या पटलावरील एकमेव संवेदनशील मुख्यमंत्री…!
महाराष्ट्राच्या ईतिहास एकमेव मुख्यमंत्री ना.देवेंद्रभाऊ फडणवीस हेच आहे की त्यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाची स्वंतत्र स्थापना करून राज्यातील लाखो रुग्णांना वैद्यकीय मदत कोणाच्याही शिफारशी शिवाय मिळवून दिली....आजही मदतीचा हा यज्ञ मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानुसार अखंड सुरू आहे..!
त्या आईनं पोटच्या गोळ्यासाठी मंगळसुत्र मोडले ते मंगळसुत्र तर त्या मातेला परत मिळवून दिलच परंतु त्या मुलांवर मोफत उपचार करण्याचे निर्देश राज्याचा मुख्यमंत्री प्रशासनास देतो आश्चर्य वाटतंय परंतु हे खरय..
गडचिरोली सारख्या दुर्गम भागातील जिल्ह्याचे पालकमंत्री पद मुख्यमंत्री महोदयांनी स्वतःहून स्विकारले आहे गडचिरोली येथील भामरागड जिल्ह्यातील एक सामान्य गरीब घरातील तरुण मुलगा आजारी होता उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून त्या आईने मंगळसुत्र मोडले शेवटी आईचं काळीज…. परंतु उपचारासाठी खर्च झेपेना मुलगा व्हेंटिलेटरवर असल्याने मुलाच्या पित्याने थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांना पत्र लिहिले “माझ्या मुलाला वाचवा” हि बाब व यासंबंधीच्या बातम्या मुख्यमंत्री महोदयांना एसएमएस व्दारे कळताच त्यांनी तत्काळ मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या प्रमुखांना निर्देश देऊन संबंधित रुग्णांवर मोफत उपचार करण्याचे निर्देश दिले यांसह उपचारासाठी खर्च झालेले एक लाख रुपये परत करण्याचे सुध्दा सांगितले…!
आईच्या उपचारासाठी धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीला मुख्यमंत्री महोदय केवळ एका मॅसेज वर ईश्वरासारखे धावुन आले होते-
सोलापूर जिल्ह्यातील एका आठवीच्या विद्यार्थ्यांची आई आजारी होती उपचारासाठी पैसे नव्हते तेव्हा त्या मुलाने तत्कालीन मुख्यमंत्री ना.देवेंद्रभाऊ फडणवीस यांना मॅसेज केला त्या मुलाच्या आईवर सुध्दा मुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळी मोफत उपचार तत्काळ उपलब्ध करून दिले होते.
संतोष जाधव
भाजप सोशल मिडिया प्रदेश कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र राज्य