गेवराई – बीड : रंगभूमीवरचे मोजमाप प्रेक्षक करतात. त्यांनी दिलेला प्रतिसाद पैशात मोजता येत नाही. रंगभूमीवर काम करणारा कलाकार कोणत्याही रोल साठी मेहनत घेऊन काम करतो. ज्यांना ग्लॅमर, पैसा हवा असतो. ते कलाकार ब्रेड-बटरसाठी मालिका, चित्रपट स्वीकारतात, हे कुणीच नाकारणार नाही. रंगभूमीवर कुणी समाधान शोधते तर कुणाला त्यातुन पैसा कमवायचा असतो. रंगभूमी एकच, मात्र भूमिका वेगवेगळी असते.
असे परखड मत अभिनेते रमेश रोकडे यांनी येथे मांडले आहे.राष्ट्रवादी सार्वजनिक शिवजयंती उत्सव सोहळा-2025 आयोजित ऐतिहासिक महानाट्याचा प्रयोग, गेवराई जि.बीड येथील र.भ.अट्टल महाविद्यालयाच्या मैदानावर मंगळवार ता. 18 रोजी आमदार विजयसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवशाही महानाट्य रंगभूमीवरच्या कलाकारांची पत्रकार परिषद पार पडली. या महानाट्याच्या रंगमंचावर शंतनू मोघे, अलका कुबल यांच्यासह 250 कलाकारांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजीमहाराज, आईसाहेब जिजाऊ, सईबाई, राजे संभाजी, हिरोजी फर्ज॔द, तुकाराम महाराज, अफजलखान, अनाजी पंत इ. च्या प्रमुख भूमिका आहेत. मुंबई येथील अभिनेते म्हणून ज्यांचा
रंगमंचावर विशेष उल्लेख करण्यात येतो. ते रमेश रोकडे , संत तुकाराम महाराज यांची भूमिका साकारणार आहेत. त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. चाहत्यांनी त्यांना गराडाच घातला आहे. 18 फेब्रुवारी रोजी त्यांनी रंगमंचावर पत्रकारांशी संवाद साधून, आपल्या भूमिके विषयी माहिती दिली. भारदस्त व्यक्तिमत्व, त्या व्यक्तिमत्वाला अगदी साजेसा आवाज असलेला अभिनेता म्हणून ज्यांची ओळख झालेली आहे. ते मुंबईचे रमेश रोकडेस्वराज्य रक्षक संभाजी महानाट्यामध्ये
रणांगण हिरोजी फर्ज॔द च्या नकारात्मक भूमिकेतून दिसणार आहेत. विश्वासराव पाटलांच्या पाणीपत कादंबरीवर आधारित असलेल्या रणांगण मालिकेत अब्दाली [ सेनापती ] च्या भूमिकेत काम केलेय. अविष्कार नाट्य संस्थेच्या व्यासपीठावर संधी मिळाली. त्यातून व्यावसायिकता म्हणून रंगमंचाशी जोडला गेलो. सावळ्याची जनू सावली, ती फुलराणी, मुलगी झाली हो, अशी विविध व्यासपीठावर त्यांनी अभिनय केलाय. शिवशाही महानाट्या मध्ये त्यांनी तीन भूमिका पार पाडल्यात. संत तुकाराम महाराज, वासुदेव, कवी भुषण ,या तीन प्रमुख व्यक्तिरेखेत ते झळकणार आहेत. ते म्हणाले की, अभिनय हा आतुन असावा लागतो. एखादे पात्र हुबेहुब साकारले की, प्रेक्षक दादा देतात. त्यांची दादा हाच सर्वोच्च बहुमान असतो. वास्तविक पाहता, रंगमंचावर खूप स्ट्रगलिंग आहे. आर्थिक गणित लवकर जुळत नाही. ही बाब लक्षात ठेवून काम करावे लागते. ब्रेड-बटर साठी मालिका आहेत. नाटकातून तेवढा आधार मिळत नाही. हे वास्तव दुर्लक्षित न करता, रंगमंचावर काम करायचे असते. हिरोजी फर्ज॔द यांची भूमिका समजून घेणे आवश्यक आहे. हिरोजी यांच्या संदर्भात अधिकची माहिती उपलब्ध होती. मात्र, ती वाचकापर्यंत आली नाही. त्यांचा छत्रपतीच्या घराण्याशी अतिशय जवळचा संबंध होता. पुढे त्यांनी स्वराज्याशी दगा केल्याने, संभाजी राजेंनी त्यांना जबर शिक्षा दिली. हिरोजी फर्जंद हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार होते. शिवरायांची आग्र्याहून सुटका झाली. तेव्हा, हिरोजी महाराजांच्या जागी झोपले होते. शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर अनाजींच्या सांगण्यावरून संभाजी राजांच्या विरुद्ध कट केल्याचा इतिहासात उल्लेख आढळतो. असे निरिक्षण रोकडे यांनी नोंदविले.
कवी भूषण आणि कवी कलश यांच्यातला फरक ही लक्षात घेतला पाहिजे. कवी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातले कवी होते. शिवशाही महानाट्या मध्ये संत तुकाराम महाराज यांच्या भूमिकेत आहे.
संत तुकाराम महाराजांनी स्वराज्याच्या उभारणीसाठी छत्रपतींना आशीर्वाद दिलेत. त्यांची भूमिका मिळणे, आनंदाची गोष्ट असल्याची भावना अभिनेते रमेश रोकडे यांनी व्यक्त केली.
सुभाष सुतार , पत्रकार गेवराई – बीड