बीड – गेवराई : : तिने पाहिले आणि तिने जिंकले. जिद्दीने दारिद्रय़ावर मात केली. अखेर यश पदरात पडले. सावरगाव ता. गेवराई येथील अभिमन्यू च्या बहाद्दर लेकीने हिमंतीने चक्रव्यूह भेदून काढल्याने तिची महसुल सहाय्यक पदावर निवड झाली. महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या परिक्षेत कु. अमृता केदार हिनेत्रदीपक यश संपादन केले आहे.
गेवराई तालुक्यातील सावरगाव येथील कु. अमृता अभिमन्यू केदार हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या [ एमपीएससी ] परिक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले असून, तिची महसुल सहाय्यक पदावर निवड झाली आहे. तिच्या यशाबद्दल सावरगाव ता. गेवराई पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी कौतुक करून कु. अमृता केदारला भावी आयुष्यासाठी आशीर्वाद दिले आहेत. घरातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मात करुन, आर्थिक अडचणीमध्ये हार न मानणाऱ्या अमृताने अत्यंत चिकाटीने मात करुन यश मिळविले आहे. नुकत्याच पार पडलेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या
परिक्षेचा निकाल जाहिर करण्यात आला आहे. गेवराई तालुक्यातील सावरगाव येथील कु. अमृता अभिमन्यू केदार स्पर्धा परिक्षेची तयारी करीत होती. पुणे, संभाजीनगर येथे राहून तिने स्पर्धा परिक्षेचा अभ्यास केला. आई-वडीलांच्या कष्टाला अभ्यासाने आकार द्यायचा निश्चिय तिने केला होता.
अखेर,
तिच्या प्रयत्नाला यश मिळाले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या [ एमपीएससी ] परिक्षेत नेत्रदीपक यश संपादन केलेआहे. तिची महसुल सहाय्यक पदावर निवड झाली आहे. तिच्या यशाबद्दल सावरकर पंचक्रोशीतील नागरीकांनी कौतुक करून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आई-वडीलांच्या कष्टाचे चीज झाले आहे. या यशाने आई-वडीलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आलेत. [ सचिन धुरंधरे – लोकसंवाद टिम ]