- -गेवराई – बीड : सुभाष सुतार :
पैठण नाथसागराच्या पायथ्यापासून सुरू होणारा जायकवाडीचा उजवा कालवा प्रवाही सिंचनाचा उत्तम नमुना आहे. वीज न वापरता कालव्यातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात येते. कालवा, वितरिकेतून सहज पाण्याची उपलब्धता, उजव्या कालव्याचे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री, मराठवाड्याचे सुपुत्र स्व. शंकरराव चव्हाण यांच्या स्वप्नातला हा प्रकल्प आहे. सरकारने लक्ष देऊन, निधी दिल्याने, उजवा कालवा वाचल्याने सिंचन प्रकल्प सुगीचे दिवस येणार आहेत. कालवा वाचल्याने, शेतकर्यांनी आनंद व्यक्त केला आहे. कालव्याने नवे रूप धारण केले आहे. जायकवाडी प्रशासनाच्या देखरेखीत जवळपास पाच कंत्राटदाराच्या एजन्सी कालवा दुरूस्तीचे काम करीत आहेत. दरम्यान, जायकवाडी धरण, उजवा – डाव्या कालव्याचा ड्रिम प्रोजेक्ट, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री, देशाचे गृहमंत्री
स्व. शंकरराव चव्हाण यांची संकल्पना होती. त्यांच्याच धोरणात्मक निर्णयाने मराठवाड्यातील हाजारो एक्कर जमीन सिंचनाखाली येऊ शकली. या सिंचन प्रकल्पाचे सर्व श्रेय स्व. शंकरराव चव्हाण यांचे आहे. हा प्रकल्प कायम टिकून राहीला पाहिजे. अशी, भावना या परिसरातील शेतकर्यांची होती.
मात्र, गेल्या काही वर्षांपासून उजवा कालवा दुर्लक्षित राहीला. सरकारचे दूर्लक्ष झाले होते. पैठणचे ज्येष्ठ नेते , माजी मंत्री भुमरे पाटील, तत्कालीन आमदार ॲड. लक्ष्मण पवार यांनी सरकार दरबारी प्रकल्पाच्या पुनरूज्जीवन व्हावे म्हणून, विशेष प्रयत्न केले. प्रशासनातील काही चांगल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा सरकारकडे पाठपुरावा केला.
सरकारने उजवा कालवा दुरूस्ती साठी निधी दिला. कालवा दुरूस्तीचे अंदाजपत्रक तयार करून निविदा प्रसिद्ध झाली. पाच एजन्सीकडून सदरील काम केले जात आहे.
उजवा कालवा प्रवाही सिंचनाचा उत्तम नमुना आहे. पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्यावर, उजव्या कालव्यातून वाहून येणारे पाणी थेट माजलगाव धरणात येते. त्यासाठी वीज पुरवठा लागत नाही. जिथे चढाव आहे. अशा, ठिकाणी सायफन तयार करून पाण्याला उतार वाट करून देण्यात आली आहे. 0 ते 132 किलोमीटर अंतरावर व्यवस्थित पाणी जावे म्हणून, कालव्यात जागो जागी चॅनल गेट आहेत. पाण्याला जोर येण्याठी चॅनलचा उपयोग होतो. त्यामुळे, उपलब्ध वितरिकेतून [ चार्या ] टेल पर्यंत [ शेवटच्या टप्प्यात ] पाणी जाण्यासाठी केलेली उपाय योजनेने शेतकर्यांची शेत जमीन ओलिताखाली येऊ शकली आहे. त्या शिवाय, जुन्या पद्धतीचा अवलंब करून, काही अल्पभूधारक शेतकरी केवळ पाईप टाकून कालव्यातून पाणी घ्यायचे. कालव्याची दुरवस्था झाल्यावर, गोरगरीब, अल्पभूधारक शेतकर्यांना अडचणी आल्या. दरम्यान, कालव्यावर नव्याने अस्तारीकरण टाकण्यात येत असून, कालवा नव्या रूपात दिसू लागला आहे. [ भाग – 5 ]