बीड – गेवराई
वै.ह.भ.प. नगदनारायण महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त वै.ह.भ.प. गुरुवर्य महंत महादेव महाराज नारायणगडकर यांच्या कृपाशीर्वादाने व प्रेरणेने श्री.ह.भ.प. प्रेम मूर्ती महंत शिवाजी महाराज मठाधिपती श्री क्षेत्र नारायणगड यांच्या शुभहस्ते व श्री.ह.भ.प. संभाजी महाराज संत तुकाराम महाराज संस्थान मादळमोही यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई शहरातील गजानन नगर येथे दिं. 4 मार्च मंगळवार रोजी पासून भव्य कीर्तन महोत्सव सोहळ्यास सुरुवात होत आहे. किर्तन महोत्सवाचे हे चौदावे वर्ष असून या कीर्तन महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. उत्तम नाना मोटे व कीर्तन महोत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, वै.ह.भ.प. नगदनारायण महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त वै.ह.भ.प. गुरुवर्य महंत महादेव महाराज नारायणगडकर यांच्या कृपाशीर्वादाने व प्रेरणेने श्री.ह.भ.प. प्रेम मूर्ती महंत शिवाजी महाराज मठाधिपती श्री क्षेत्र नारायणगड यांच्या शुभहस्ते व श्री.ह.भ.प. संभाजी महाराज संत तुकाराम महाराज संस्थान मादळमोही यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई शहरातील गजानन नगर येथे दिं. 4 मार्च मंगळवार रोजी पासून भव्य कीर्तन महोत्सव सोहळ्यास सुरुवात होत आहे. किर्तन महोत्सवाचे हे चौदावे वर्ष असून किर्तन महोत्सवातील दैनंदिन कार्यक्रम पुढील प्रमाणे दिं. 4 मार्च मंगळवार रोजी रात्री नऊ ते अकरा श्री. ह.भ.प. उदबोध महाराज पैठणकर (देऊळगाव राजा) यांचे हरी किर्तन तसेच दिं. 5 मार्च बुधवार रोजी नऊ ते अकरा श्री.ह.भ.प. तुळशीराम महाराज काकडे (श्रीक्षेत्र पैठण) यांचे सुश्राव्य कीर्तन त्याचबरोबर दिं. 6 मार्च गुरुवार रोजी रात्री नऊ ते अकरा श्री.ह.भ.प. गोविंद महाराज गोरे (श्री क्षेत्र आळंदी देवाची) दिं. 7 मार्च शुक्रवार रोजी रात्री नऊ ते अकरा श्री.ह.भ.प. मच्छिंद्र महाराज निकम (नेवासा) दिं. 8 मार्च शनिवार रोजी रात्री नऊ ते अकरा श्री.ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले (डिकसळ) दिं. 9 मार्च रविवार रोजी रात्री नऊ ते अकरा श्री.ह.भ.प. संतोष महाराज आढावणे पाटील (भोकरदन) दिं. 10 मार्च सोमवार रोजी रात्री नऊ ते अकरा श्री.ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे (पुणे) यांचे हरिकीर्तन होणार असून दिनांक 11 मार्च मंगळवार रोजी सकाळी 11 ते 1 यावेळी मध्ये प्रेममूर्ती महंत हे.भ.प. शिवाजी महाराज मठाधिपती श्री क्षेत्र नारायणगड यांचे सुश्राव्य असे काल्याचे किर्तन होणार असून यानंतर मोहनशेठ बन्सीलाल भुतडा व राधेश्याम नामदेव निकम यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी या सर्व कार्यक्रमाचा गेवराई व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री. उत्तम नाना मोटे व किर्तन महोत्सव आयोजन कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.