मुंबई दि. 4 : महायुती सरकारचे मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवार ता. 4 रोजी राजीनामा दिला. 9 डिसेंबर 2024 रोजी, सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मिक कराड यांचा सहभाग होता. या प्रकरणात वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आली आहे. एक आरोपी अद्याप फरार आहे. अन्य आरोपी अटक आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून धनंजय मुंडे यांच्यावर राजीनामा देण्यासाठी प्रचंड दबाव होता. सरकार त्यांना पाठिशी घालत होते. त्यामुळे, सामाजिक चळवळीत काम करणाऱ्यांनी तिव्र संताप व्यक्त करून देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध केला होता. दरम्यान, संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्या हत्या प्रकरणातील फोटो सोमवार ता. 3 रोजी रात्री इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये
व्हायरल झाले होते.
कोणत्याही संवेदनशील माणसाचा थरकाप उडेल, अंगावर शहारे येतील, अशा पद्धतीने मारहाण करून सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरतेने हत्या केली. त्यानंतर, महाराष्ट्रात हादरला आहे.
घटनेची पाश्र्वभूमी – बीड जिल्ह्य़ातील मस्साजोग ता. केज येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंगळवार ता. 7 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे बैठक घेतली. आम्हाला न्याय द्या, एवढी एकच मागणी देशमुख कुटुंबाने यावेळी केली. दरम्यान, गुन्हेगार किती मोठा असू देत, कुणालाच सोडणार नाही. असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख कुटुंबाला दिले आहे. मंगळवार ता. 7 रोजी देशमुख कुटुंब, आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. भेटीनंतर देशमुख कुटुंबातील सदस्यांनी माध्यमांशी संवाद साधून, आम्हाला केवळ न्याय हवाय, दुसरा एकही विषय आमच्या समोर नाही. आरोपींना कठोर शासन झाले पाहिजे. एवढी एकच मागणी आम्ही सरकारकडे केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख कुटुंबावर अन्याय होणार नाही. आरोपी कोणी ही असूदेत, त्यांना कठोर शिक्षा होणारच, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले होते. मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यासह कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. मारेकरी कोणीही असो, सोडणार नाही. बीडच्या गुन्हेगारांचा बंदोबस्त करूच, मात्र त्या शिवाय गुंडाचा बंदोबस्त करायला पोलीस सक्षम असून, देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून दिल्याशिवाय सरकार गप्प बसणार नाही.
दरम्यान, बीड जिल्ह्य़ातल्या
केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या प्रकरणात फरार आरोपींपैकी प्रमुख सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना बीडच्या पोलिसांनी शुक्रवारी (ता.३) मध्यरात्री रात्री पुण्यातून ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा गतीने उलगडा होणार असून, पोलीस ॲक्शन मोडवर होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. आरोपी
घुले, सांगळे या दोघांना पोलिसांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात दिले जाणार असल्याची माहिती बीडची पोलीस अधीक्षक नवनीत काॅवत यांनी दिली आहे.
मस्साजोग [ बीड ] येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले जात असून, खंडणी वसुली प्रकरणात वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे, ना. मुंडे यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढला आहे. स्वकीय आणि विरोधक, अशा दोन्ही बाजुनी मुंडेंना घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दरम्यान, देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचा सहभाग दिसून आल्यास, विरोधक आणखी आक्रमक होतील, अशी माहिती समोर येत असून
मुंडेंच्या राजीनामा कळीचा मुद्दा झाला आहे. ना. मुंडेची विकेट जाणार की स्वतःहून ते मंत्री पदाचा राजीनामा देणार, याकडे लक्ष लागले आहे.
सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून, निर्दयी हत्या करण्यात आली होती. त्यानंतर, या प्रश्नावर महाराष्ट्रातून तिव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. मारेकऱ्यांनी देशमुख यांची टाॅर्चर करून हत्या केली होती. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा संबंध असल्याचा गंभीर आरोप करण्यात आल्यानंतर, या प्रकरणाने गंभीर वळण घेतले. खंडणी वसूली प्रकरणात वाल्मिक कराड शरण आलेत. त्यांना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख हत्या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन, आरोपींना सोडणार नाही. कोणी कितीही जहागिरदार असला आणि कोणा ही नेत्याच्या जवळचा असला तरी, त्याला फासावर लटकवू , गुन्हेगारांना माफी नाही म्हणजे नाही. असा पावित्रा खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतल्याने, देशमुख हत्या प्रकरणात एसआयटी, सीबीआय, बीड पोलीस ॲक्शन मोडवर आलेली आहे. आरोपींची बॅन्क खाती फ्रिज करण्यात आलीत. बीड मध्ये महामोर्चा काढून, देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध करण्यात येऊन, आरोपीला फासावर लटकवा, अशी सर्वपक्षीय मागणी करण्यात आली आहे.बीड जिल्ह्य़ातील आमदार ज्येष्ठ नेते प्रकाश दादा सोळंके [ अजितदादा गट ] , माजी मंत्री आ. सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर यांनी आक्रमक होऊन धनंजय मुंडेंना घेरले आहे. वाल्मिक कराडचा दहशतवाद म्हणजे ना. धनंजय मुंडे यांचा आशीर्वाद, असा थेट आरोप तिघांनी ही केला आहे. स्वपक्षातील आमदार, नेते, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते, खा. बजरंग सोनवणे, खा. सुप्रियाताई सुळे यांनी ही देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे हेच प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप करून, आक्रमक पणे धनंजय मुंडे यांना टारगेट केले आहे. अद्याप, उपमुख्यमंत्री अजित दादांनी भूमिका जाहीर केलेली नाही. चौकशी अंती सत्य बाहेर येऊ द्या, मग निर्णय घेता येईल, अशी भूमिका ज्येठ मंत्री विखे पाटील यांनी मांडली आहे. भाजपा मध्ये दोन मतप्रवाह आहेत. ना. पंकजा मुंडे सायलेंट मोडवर आहेत. मारेकऱ्यांना फाशी द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. ना. धनंजय मुंडे यांनी ही, आरोपींना फासावर लटकवा अशी मागणी होतेय. नोव्हेंबर 2024 मध्ये देशमुख यांची अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती.