बीड – गेवराई : येथील युवा सामाजिक कार्यकर्ते लाला दिलीपराव सुतार यांची दिव्यांग आधार विकास बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी निवड जाहिर करण्यात आली आहे. जिल्हाभरातील दिव्यांग बांधवांनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.
दिव्यांग आधार विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेख नासेर , सचिव नाजमीन यांनी नियुक्ती पत्र दिले असून, दिव्यांगांवर अनेक स्तरावरून होत आलेले अन्याय अत्याचाराच्या विरूद्ध करिता दिव्यांग आधार विकास बहुउद्देशीय सेवा संस्था महाराष्ट्र राज्यात सतत कार्यरत आहे. महाराष्ट्रातील जाती जमातीचे बंधन तोडून व दिव्यांग बांधवांसाठी एकजुटीने एकत्र येऊन त्यांच्या हक्कांसाठी लोकशाही मार्गाने लढा उभारून, अन्यायाच्या विरोधात लढा देण्यासाठी दिव्यांग आधार विकास बहुउद्देशीय सेवा संस्थेचे बीड जिल्हा आध्यक्ष म्हणून श्री. लाला दिलीपराव सुतार यांची निवड करण्यात येत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. दिव्यांग आधार विकास बहुउद्देशीय सेवा संस्था मोठ्या अपेक्षेने आणि विश्वासाने ही जबाबदारी आपल्यावर सोपवत आहे. आपल्या कार्याच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांच्या हिता करिता नेहमी कार्यरत राहावे व दिव्यांग आधार बिकास बहुउद्देशीय सेवा संस्था या संस्थेस मोठ्या जोमाने पुढे न्याल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. युवा कार्यकर्ते
लाला दिलीपराव सुतार यांची दिव्यांग आधार विकास बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी निवड जाहिर करण्यात आली आहे. जिल्हाभरातील दिव्यांग बांधवांनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.