गेवराई – बीडी : क उत्पादनावरील वाढता खर्च कमी करण्यासाठी व किडीची वाढती रोगप्रतिबंधक क्षमता रोखण्यासाठी एकात्मिक पद्धतीनेच किड नियंत्रण होणे गरजेचे आहे. असे, प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्र खामगाव येथील कीटक शास्त्रज्ञ डॉ बी बी गायकवाड यांनी केले.
मंडळ कृषी अधिकारी कार्यालय उमापुर आयोजित गुंतेगाव येथील कृषी दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच विलास वाघमोडे प्रमुख पाहुणे म्हणून जय भवानी सहकारी साखर कारखाना शिवाजीनगर चे संचालक नंदकिशोर गोरडे,अंबड तालुक्यातील उसाचे एकरी 90 टन उत्पादन घेणारे युवा कृषी पदवीधर शेतकरी सावता काळे, कृषी तंत्रज्ञान प्रसारक बाबू येवले, मंडळ कृषी अधिकारी काकासाहेब पंडित, कृषी पर्यवेक्षक किशोर पठाडे हे उपस्थित होते .
प्रभावी किड एकात्मिक नियंत्रणासाठी खोल नांगरट, पक्षी थांबे , पिवळे निळे चिकट सापळे , प्रकाश सापळे ,निंबोळी अर्काचा वापर करावा असे श्री गायकवाड यांनी यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक मंडळ कृषी अधिकारी काकासाहेब पंडित यांनी केले पीक उत्पादनामध्ये जमिनीच्या मगदूराप्रमाणे वाणाची निवड करून पिकाच्या संवेदनशील अवस्थेत संतुलित पाण्याचा व संतुलित खताचा वापर केल्यास अपेक्षित उत्पादन घेता येते असे सांगितले .
प्रगतशील युवा शेतकरी श्री काळे यांनी उसाचे एकरी 90 टन उत्पादन तंत्रज्ञान मध्ये बेणे निवड, बेणे प्रक्रिया, संजीवकाचा कार्यक्षम वापर व स्वतः चा अनुभव विशद केला.
श्री बापू येवले यांनी बीज प्रक्रिया विद्राव्य खताचा उत्पादन वाढीमध्ये सहभाग याविषयी उपयुक्त माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहाय्यक मेघराज नाटकर तर आभार प्रदर्शन महावीर मैन्द यांनी केले या कार्यक्रमाप्रसंगी योगेश गोरडे, बंडू गोरडे ,बदाम गोरडे ,किरण येवले, अशोक जाधव रवी खोसे पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी व कृषी सहाय्यक शांतीलाल करंडे ,नचिकेत जोशी, योगेश सुरदुसे ,संदीप महाडिक,प्रदीप मुने,वैष्णवी आरे उपस्थित होते.






