बीड – जालना बस स्थानकातून बीड कडे निघालेली जालना-बीड बस अक्षरश: धुळीने भरलेली होती. या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्याचा मानसिक त्रास सहन करावा लागला. प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. हा प्रकार मंगळवार ता. 25 रोजी सकाळी 10.30 दरम्यान घडला आहे.
दरम्यान, बस वाहकांनी स्वतःच्या हातात कपडा घेऊन बसची सीट स्वच्छ करून दिली. जालना आगाराचे जिल्हा व्यवस्थापक नेमके काय करतात, नुसत्या
झोपा काढतात का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.जालना बस आगाराची बस क्रमांक 2550 स्लीपर सिटर, सोमवार ता. 25 रोजी सकाळी 9 वाजता जालना येथून निघाली होती. सदरील बस गेवराई जि.बीड येथील बसस्थानकावर साडे दहा वाजण्याचे सुमारास आली होती. बस मध्ये असलेली आसन व्यवस्था धुळीने माखलेली होती. बस मध्ये गर्दी झाल्याने, प्रवाशांनी आहे त्या अवस्थेत बस मधून प्रवास केला. मात्र, जवळपास सगळ्या सीटवर धुळ बसलेली होती. त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागला. बस च्या शेवटचे खाली व वर असलेले सीट धुळीने घाण झालेले होते. अक्षरश: बसच्या वाहकाने हातात कपडा घेऊन महिला बसलेल्या जागा स्वच्छ करून दिल्या. वास्तविक हे काम आगार व्यवस्थापकाच्या देखरेखीत संबंधित कर्मचाऱ्यांकडून करून घेणे अपेक्षित आहे. दरम्यान, धुळीने माखलेली बस, त्यात प्रवास भाड्याची [ गेवराई ते बीड 83 रू ] किंमत अव्वाची सव्वा देऊन, मानसिक त्रास सहन करावा लागत असेल तर, लाल परीवर कसा विश्वास ठेवायचा असा सवाल आहे.






