गेवराई : बीड :
गेवराई पासून जवळ असलेल्या
राष्ट्रीय महामार्गावर एका ट्रकने पेट घेतल्याची घटना बुधवार ता. 9 रोजी घडली आहे. घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नसल्याची माहिती असून, गेवराई पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सदरील मालट्रक शहागड ओलांडून बीड कडे जात असताना बायपास राष्ट्रीय महामार्गावर पांढरवाडी पुलाजवळ ट्रकने अचानक पेट घेतला. आग कशाने लागली, या संदर्भात अधिकृत माहिती आली नाही. उन्हाचा पारा वाढल्याने, गाड्यांचे इंजिन गरम होत असून, चालकांनी लक्ष देऊन वाहन चालवावे असे आवाहन करण्यात आले आहे.
ट्रकने अचानक पेट घेतल्याची बाब लक्षात आल्याने, प्रसंगावधान राखून चालकाने स्वतःचा जीव वाचवला.
दरम्यान, बुधवार दि. 9.4.2025 रोजी सायंकाळी 06:30 च्या सुमारास धुळे वरून चेन्नई च्यादिशेने जाणारा टाटा कंटेनर MH-20 GC-5812 अचानक पेटल्याने, वाहतूक विस्कळीत झाली होती.
यावेळी महामार्ग कर्मचारी प्रतीक कदम,महादेव पवार बाळासाहेब काटे व अग्निशमन च्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली.






