बीड :
परवीन याकूब शेख अन्सारी यांना डॉ. बाबासाहेब अंबेडकर मराठवाड़ा विद्यापीठाकडून नुकतीच हिंदी विषयातून पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.त्यांनी “मैत्रयी पुष्पा के उपन्यासो में चित्रित नारी कें विविध रूप ” या विषयावर संशोधन कार्य केले आहे. मार्गदर्शक म्हणून धाराशिव जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर प्राचार्य डॉ़ मुकुंद गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव चे संशोधन केन्द्रप्रमुख डॉ केशव क्षीरसागर ,निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टच्या सचिव डॉ.एम.डी.पाथ्रीकर,अध्यक्ष डॉ.देवेश पाथ्रीकर,ट्रस्टी डॉ.एस.एस.शेख,डॉ.खान नाजमा ,डॉ.प्रज्ञा सानप पाथ्रीकर यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बदनापूर येथील प्राचार्य आणि उपप्राचार्य व सर्व सहकारी यानी विशेष सहकार्य केले.
बीड जिल्ह्यातील गेवराई येथील सामाजिक कार्यकर्ते तथा महाराष्ट्र काँग्रेस अल्पसंख्याक कमिटीचे उपाध्यक्ष शेख याकूब अन्सारी याची परवीन अन्सारी कन्या असून दैनिक दिव्य मराठीचे बदनापूर तालुका प्रतिनिधी सय्यद नजाकत यांच्या पत्नी आहे तसेच साप्ताहिक गावमत च्या कार्यकारी संपादिका आहेत. परवीन अन्सारी यांची पी.एच.डी ची मौखिक परीक्षा छत्रपती संभाजीनगर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभाग प्रमुख डॉ.संजय राठोड यांच्या समितीने घेतली असून मुंबई विद्यापिठातील हिंदी विभागाचे अधिष्ठाता तथा ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील सोनुभाऊ महाविद्यलयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.अनिल सिह यांनी बाह्य परीक्षक म्हणून काम बघितले.ऑनलाईन मौखिक परिक्षेअंती परवीन अन्सारी यांना हिंदी विषयात डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.






