गेवराई : बीड – आठ दिवसापूर्वी झालेल्या चोरी प्रकरणाचा वेगाने तपास करून, आरोपीला जेरबंद करण्यात चकलांबा पोलीसांना यश आले आहे. उमापूर येथील बीअरबार हॉटेलवर अज्ञात चोरटय़ांनी साडे सहा लाखाचे वाईन बाॅक्स लंपास केले होते. पोलीसांना आव्हान देणाऱ्या चोरटय़ांविरुद्ध चकलांबा ता.गेवराई जि.बीड पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवून आठवडाभरात आरोपीला जेरबंद केल्याने, पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांनी कौतुक केले जात आहे. पोलीस ठाणे चकलांबा येथे फिर्यादी , मदन भीमराव बनसोडे, रा.उमापुर ता. गेवराई जि.बीड ह.मु. महाराष्ट्र कॉलनी, नडे नगर काळेवाडी पिंपरीचिचवड जि.पुणे.
यांनी पोलीस ठाणे चकलांबा येथे दिनांक 08.05.2025 रोजी समक्ष हजर येवुन तक्रार दिली की, दिनांक 07.05.2025 रोजी 10:00 वा. सुमारास माझे बीअर बार चे मॅनेजर बबन भागवत बने यांचा फोन आला. त्यांनी सांगीतले की, दिनांक 06.05.025 रोजी नेहमी प्रमाणे मी रात्री 10 वा. बीअर बार पूर्ण पणे बंद करुन घरी गेलो होतो. दिनांक 07.05.2025 रोजी सकाळी 10:00 वा. बीअर बार होटेलचे समोरचे शटरवर केले असता, आतमधील शटर चे लॉक कोणी तरी अज्ञात व्यक्तीने तोंडुन आत प्रवेश करून, गोडावुन मधील पण दारुचे बॉक्स घेवुन गेले असुन ते आज्ञात चोरटे आपल्या बार मधील सी.सी.टिव्ह डीव्हिआर पण घेवुन गेले आहेत. वैगरे मजकुराची तक्रार पोलीस ठाणे चकलांबा येथे दिल्याने सदरच्या तक्रारी वरुन पोलीस ठाणे चकलांबा येथे दखलपात्र गुन्हा रजिस्टर नंबर 160/2025 क 365 व ईतर भा. न्या. सं अन्वये दाखल केलेला आहे. दरम्यान, सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे चकलांबा येथील प्रभारी अधिकारी सपोनि संदिप पाटील यांनी गुन्ह्याचे तपासीक अंमलदार पोउपनि अनंता तांगडे यांना आरोपीचा शोध घेणे कामी सुचना दिल्या होत्या. एक पथक नेमुन लवकरात लवकर आरोपीतांचा शोध घेणे बाबत सांगीतल्याने दिनांक 15.05.2025 रोजी सदर गुन्ह्याचे अनुषंगाने आरोपीची माहिती घेतली असता सदरील आरोपी हा राहुरी पोलीस स्टेशन येथे असल्याचे समजले. पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर पोलीस स्टेशनला पाठवुन सदर गुन्ह्यातील आरोपी नामे दिपक अरुन चव्हाण [ वय 28 वर्षे रा नेवासा फाटा ता नेवासा जि अहिल्यानगर ] यास ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन चकलांबा येथे हजर करुन त्यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. तसेच त्याच्याकडुन वरील गुन्ह्यातील गेला माल 10 बॉक्स विदेशी दारु हस्तगत करण्यात आलेली असुन पुढील गुन्ह्याचा तपास करीत आहोत. दरम्यान, आरोपींविरुद्ध अटकेचे कारवाई करण्यात आल्याने, अन्य चोरी प्रकरणाचाही उलगडा होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत असून, उमापूर येथील बीअरबार होटेलवर झालेल्या धाडसी चोरीचा छडा लावण्यात, चकलांबा पोलीसांना यश आल्याने, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.






