गेवराई- बीड : गढी ता. गेवराई जवळ घडलेल्या अपघातात सहाजण ठार झालेत. ही दुर्दैवी घटना सोमवार ता. 26 रोजी घडली होती. या घटनेला पाडळसिंगी टोल नाका प्रशासन जबाबदार आहे. या जबाबदारी पूर्णत: त्यांचीच आहे. संबंधितांवर कडक कारवाई करून, गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते ॲड.संजय काशीनाथराव काळे यांनी केली आहे. मागणीचे सविस्तर निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले आहे.
पाडळसिंगी टोल नाका ते गढी पर्यंत च्या रस्त्यावर जागोजाग लवण आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडलेत. त्यामुळे, अपघातात झालेत. परंतू , निगरगट्ट प्रशासन गेंड्याची कातडी पांघरूण, कोटीची टोल वसूल करण्यात दंग आहे. राष्ट्रीय महामार्ग व केंद्रीय परिवहन कार्यालयाला अपघात स्थळा संदर्भात अनेकदा विनंती केली. प्रत्यक्ष भेटून आंदोलनाची नोटीस दिली आहे. मात्र, निवेदनाची दखल न घेता, टोलनाका प्रशासन डोळेझाक करत आहे. आमचं
कोणीच काही वाकडं करू शकत नाही. राष्ट्रीय महामार्ग एजन्सी
व आय.आर.बी. यांची मुजोरी वाढत चालली आहे. गढी जवळ घडलेला अपघात रात्री अकरा वाजता घडला. त्यावेळी दोन्ही ठिकाणच्या लाईट बंद होत्या. गेल्या आठवडय़ात पावसाचा जोर होता. त्यामुळे,
खड्ड्यात पाणी साचल्याने अनेक वाहणांचा ताबा सुटल्याने अपघात झालेत. या अपघाताची संपूर्ण जबाबदारी टोळ धाड प्रशासनाची आहे. संबंधित अधिकारी यांचेवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते ॲड. संजय काशीनाथराव काळे यांनी केली आहे. संबंधित मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले आहे.






