Loksamvad News | लोकसंवाद न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • गेवराई
  • राजकारण
  • मनोरंजन
  • विश्लेषण
  • क्राईम
  • कृषी विशेष
  • शिक्षण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • गेवराई
  • राजकारण
  • मनोरंजन
  • विश्लेषण
  • क्राईम
  • कृषी विशेष
  • शिक्षण
  • संपादकीय
No Result
View All Result
Loksamvad News | लोकसंवाद न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • गेवराई
  • राजकारण
  • मनोरंजन
  • विश्लेषण
  • क्राईम
  • कृषी विशेष
  • शिक्षण
  • संपादकीय

पोलीस अधिकाऱ्यास पुन्हा अटक

संपादक सुभाष सुतार by संपादक सुभाष सुतार
June 1, 2025
in महाराष्ट्र
पोलीस अधिकाऱ्यास पुन्हा अटक

बीड –
राजकीय नेते आणि पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर
आरोप करून बदनामी केल्याप्रकरणी बीडचा वादग्रस्त बडतर्फ पोलिस अधिकारी रणजित कासले यांना पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे.
अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता मुंबई गुन्हे शाखेच्या दोन दिवसांच्या कोठडीत पाठवले. वादग्रस्त वक्तव्ये आणि वादग्रस्त दावे करणारा बीडचा बडतर्फ पोलिस अधिकारी रणजित कासले विरुद्ध बीडच्या सायबर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. बीड येथील सामाजिक कार्यकर्ते मोहन आघाव यांच्या फिर्यादीवरून रणजित कासले विरुद्ध सामाजिक शांतता भंग करून दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याबद्दल सोशल मीडियावर बदनामीकारक भाष्य केल्याप्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांच्या फिर्यादीवरून दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड पोलिस दलात कार्यरत असताना गुजरातमध्ये जाऊन खंडणी मागितल्याप्रकरणी रणजित कासलेला निलंबित करण्यात आले होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याचा कट रचल्याचा थेट आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करून कासले यांनी राज्यात खळबळ उडवून दिली होती. कासलेंवर यापूर्वीही बीड, परळी, अंबाजोगाई आणि मुंबईत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या प्रकरणात १८ एप्रिल रोजी त्यांना अटकही झाली होती. अटकेच्या आधीच रणजित कासले यांना पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले होते.

आठवडाभरापूर्वीच त्याला जामीन मिळाला होता.रणजित कासले यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत वादग्रस्त वक्तव्ये आणि वादग्रस्त दावे केलेले आहेत.

निवडणुकीत ईव्हीएमपासून दूर राहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या माणसाकडून आपल्या खात्यावर १० लाख रुपये टाकण्यात आल्याचा दावा करून रणजित कासलेने खळबळ उडवून दिली होती. वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्यासाठी आपल्याला ऑफर देण्यात आली होती. त्यासाठी आपल्याला ५० कोटी रुपये देऊ केले होते. असा दावाही त्याने केला होता
जामीन मिळाल्यानंतरही रणजित कासलेने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत धक्कादायक दावे केले. शनिवारी (२४ मे) रोजी रणजित कासलेने नवा व्हिडीओ शेअर करत वाल्मिक कराड प्रकरणी मोठे दावे केले होते. वाल्मिक कराडला तुरुंगात खास चहा दिला जातो. त्याच्या जेवणात चांगल्या प्रतीच्या चपात्यांची विशेष व्यवस्था केली जाते. वाल्मिक कराड स्वतःसह इतर कैद्यांच्या नावावर तुरुंगातील कॅन्टीनमधून दरमहा तब्बल २५ हजार रुपयांची खरेदी करत आहे. वाल्मिक कराडला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे. असा दावा रणजित कासले यांनी केला होता. बीड जेल च्या कैद्यांना तुरुंगात केवळ पांघरण्यापुरते कपडे पुरवले जात असताना वाल्मिक कराडला सहा-सहा ब्लँकेट दिले गेलेत. असा दावा त्यांनी केला. त्यानंतर, बीडचे कारागृह अधीक्षक बक्सार मुलानी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. दरम्यान, बडतर्फ कासले यांना शनिवारी दिल्लीत अटक झाली.


Previous Post

आयआरबी चे वरातीमागून घोडे – ही मुजोरी मोडून काढण्याची गरज

Next Post

पुन्हा एकदा राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पदी अण्णासाहेब राठोड

संपादक सुभाष सुतार

संपादक सुभाष सुतार

Next Post
पुन्हा एकदा राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पदी अण्णासाहेब राठोड

पुन्हा एकदा राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पदी अण्णासाहेब राठोड


ताज्या बातम्या

आमन सुतार यांना स्वीकृत सदस्य म्हणून काम करण्याची संधी द्या – मातंग समाजाची मागणी

आमन सुतार यांना स्वीकृत सदस्य म्हणून काम करण्याची संधी द्या – मातंग समाजाची मागणी

December 28, 2025
पोलीस ठाण्यात हजर होताच बाळराजे पवार यांच्यावर अटकेची कारवाई

बाळराजे पवार – सिर्फ नाम ही काफी है…!

December 21, 2025
कायदा हातात घेऊ नका, गेवराई पोलीस ॲक्शन मोडवर , शहरात तगडा बंदोबस्त – पोनि. किशोर पवार

कायदा हातात घेऊ नका, गेवराई पोलीस ॲक्शन मोडवर , शहरात तगडा बंदोबस्त – पोनि. किशोर पवार

December 20, 2025
गेवराईत थरार – पोलीसांचे कौतुक,

गेवराईत थरार – पोलीसांचे कौतुक,

December 18, 2025
जामीन मंजूर  – बाळराजे पवार अटक प्रकरण

जामीन मंजूर – बाळराजे पवार अटक प्रकरण

December 17, 2025
पोलीस ठाण्यात हजर होताच बाळराजे पवार यांच्यावर अटकेची कारवाई

पोलीस ठाण्यात हजर होताच बाळराजे पवार यांच्यावर अटकेची कारवाई

December 16, 2025
  • Contact Us
  • About Us

© 2025. Website Development Mahesh Vispute (Beedkar) : 9822318809

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • गेवराई
  • राजकारण
  • मनोरंजन
  • विश्लेषण
  • क्राईम
  • कृषी विशेष
  • शिक्षण
  • संपादकीय

© 2025. Website Development Mahesh Vispute (Beedkar) : 9822318809

Join WhatsApp Group