गेवराई – बीड : घरामध्ये, मी एकटा कर्ता पुरुष आहे. अडीच एक्कर कोरडवाहू शेती असून, तीन मुले आहेत. त्यांचे शिक्षण, घर प्रपंच सांभाळून काम करत होतो. पण, गणित जुळत नाही. डोक्यावर कर्ज आहे.
त्यातच, कर्करोग आजाराने त्रस्त झालो. मी, हतबल झालोय. त्यामुळे, जगाचा निरोप घेतोय. आता तरी, बॅन्केने त्रास देऊ नये, अशी इच्छा व्यक्त करून, धोंडीराम ससाणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
सदरील घटनामंगळवार ता. 3 जून रोजी पहाटे पाच वाजता तांदळा ता. गेवराई येथे घडली आहे.
तांदळा ता. गेवराई जि.बीड येथील अल्पभूधारक शेतकरी धोंडीराम चंद्रभान ससाणे [ वय वर्ष 50 ] यांच्या कडे मराठवाडा ग्रामीण बॅन्केचे कर्ज आहे. शेतीतून येणाऱ्या उत्पन्नावर त्यांचा प्रपंच चालायचा. त्यांना अडीच एक्कर कोरडवाहु शेती असून, पत्नी, दोन मुले व एक मुलगी आहे. त्यांचे घर शेतीवर अवलंबून असल्याने, गणित बिघडले. मुलीचे लग्न, बॅन्केचे कर्ज आणि या सगळ्या धावपळीत त्यांना कर्करोगाने गाठले. या सर्व धावपळीत नैराश्य आलेल्या धोंडीराम चंद्रभान ससाणे,रा. तांदळा ता. गेवराई जि.बीड, या अल्पभूधारक शेतकर्याने मंगळवार ता. 3 रोजी पहाटे पाच वाजता गळ्याला फास लावून आत्महत्या केली. दरम्यान, मंगळवार ता. 3 रोजी दु. एक वाजता शोकाकुल वातावरणात मयत शेतकर्यावर तांदळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
आत्महत्ये पूर्वी मयत शेतकरी धोंडीराम ससाणे यांनी स्वहस्ताक्षरात एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात म्हटले आहे की,
श्री – धोंडीराम स चंद्रभान ससाणे रा. मौजे तांदळा ता-गेवराई,
परिस्थिती जेमतेम अडीच एकर जमीन तीन मुल. त्यांचे शिक्षण त्यांची लग्न ही कसरत म्हणावी हिः सर्व काही तारेवरची लागेल. शेती म्हणजे लहरी कधी पाऊस जास्त तर कधी कमी या सर्व गोष्टीचा गणित अंदाज करणे खुप, आवघड गोष्ट त्यामुळे मि. घरातला कर्ता पुरुष आणि मी कर्करोगान पिडीत आजारी ,आशा गर्दी आजाराणे कुटुंब अगदी चरख्या खालून काढल्या सादर झाले आहे. आता या सर्व काही गोष्टी सहन होत नाहीत. म्हनुन चिठी लिहुन ठेवत आहे- महाराष्ट्र ग्रामीण बैंक कोळगाव यांचे कर्जत रिश्वत करतन छी आहे. त्यांनी तात्काळ आता तरी त्या आत्महात्या ग्रस्त नोंद करून घ्यावी हि विनंती.
आपला
शेतकरी पुत्र धोंडीराम चंद्रभ ससाणे






