गेवराई – बीड : लहुजी शक्ती सेनेच्या मराठवाडा युवक संघटक पदी विनोद भाऊ थोरात यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचे निवडीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष कैलास दादा खंदारे ,तसेच महाराष्ट्र राज्य महा सचीव बालाजी भाऊ गायकवाड व युवक प्रदेशाध्यक्ष सचीव भैय्या क्षिरसागर यांच्या आदेशानुसार, तसेच माजी जिल्हा परीषद सदस्य विलास मोमीन यांच्या मार्गदर्शनाखाली बिड शासकीय विश्रामगृहात लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये – लहुजी शक्ती सेनेच्या मराठवाडा युवक संघटक पदी विनोद भाऊ थोरात यांची निवड करण्यात आली. त्यांचे निवडीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. निवड झाल्याबद्दल, विनोद थोरात यांनी सांगितले की,
समाजाच्या प्रश्नावर आवाज उठवून, त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. विविध विषयांवर समाजाच्या विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.






