संवादाने जगाला जवळ आणले आहे. लघू माध्यमांनी चमत्कारिक बदल झालेत. माध्यमांचा भाष्यकार मार्शल मॅकलूहान म्हणतो, जग हे एक खेडे होईल. या अर्थाने संवादाने विश्व व्यापून टाकले. इलेक्ट्रॉनिक महाक्रांतीने मानवी संवादाच्या कक्षा प्रचंड विस्तारल्या आहेत. एकीकडे असे चित्र असताना,या नव्या क्रान्तीमुळे आपसातला संवाद कमी होतोय की काय, असा प्रश्न मनात घोळतो आहे. या भाऊगर्दीत अनेक प्रश्न बाजुला गेलेत की काय, असे वाटायला आहे. वर्तमान राजकीय परिस्थितीने लोक चिंतेत आहेत. म्हणून, या व्यासपीठावर अनेक विषय “लोकसंवाद” च्या माध्यमातून आपल्या पुढे ठेवून, समावेशक भूमिका मांडू.लोक विचाराला चालना देऊन, त्यांच्यात जीवनसत्वाची साखर पेरणी करायचे काम माध्यमांचे असते. हाच धागा पकडून,आपल्या भरवशावर आम्ही “लोकसंवाद”या यूट्यूब चॅनलची मुहूर्तमेढ रोवली आहे. या व्यासपीठावरून लोकसंवादसाधून समाजातल्या विविध क्षेत्रातील विषयावरचे चित्रण आम्ही मांडणार आहोत. आपण सोबत आहातच, आपल्या प्रतिसादाने आम्हाला बळ मिळेल ,अशी अपेक्षा आहे.ज्ञानोबाराय यांनी सांगितलय,”या र्हृदयाशी त्या र्हृदयी घातले..!
-सुभाष सुतार
ईमेल आयडी : sutarsgeorai@gmail.com
मोबाईल : 94042 53386