गेवराई – बीड : गेवराई चे तालुका कृषी अधिकारी म्हणून वैजापूर येथून आलेले किरण वीरकर यांनी मंगळवार ता. 24 रोजी सकाळी अकरा आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. गेवराई तालुक्यातील पाणलोट क्षेत्रात असलेल्या पीक परिस्थितीचा आढावा घेऊन, नवे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकर्यापर्यंत कृषी विकसित संकल्प घेऊन जाण्याला प्राधान्य देऊ आणि शासनाच्या योजनांचा लाभ, यावर आपला भर राहील, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित तालुका कृषी अधिकारी किरण वीरकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली आहे.दरम्यान, तालुक्यातील शेतकर्यांसाठी फार्मल आयडी आवश्यक असून, सर्व शेतकरी बांधवांनी ,आपला आयडी तयार करून घ्यावा, असे आवाहन ही त्यांनी केले आहे.
गेवराई येथील तालुका कृषी कार्यालयाचे नवनिर्वाचित तालुका कृषी अधिकारी म्हणून किरण वीरकर यांनी पदभार स्वीकारला आहे. तत्कालीन तालुका कृषी अधिकारी वडकुते यांची बदली झाली आहे. त्यांच्या संदर्भात कृषी कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याच तक्रारी होत्या. त्यामुळे, ते वादग्रस्त अधिकारी म्हणून चर्चेत आले होते. अखेर, त्यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी वैजापूर येथून वीरकर यांची नियुक्ती झाली आहे.गेवराई चे तालुका कृषी अधिकारी म्हणून वैजापूर येथून आलेले किरण वीरकर यांनी मंगळवार ता. 24 रोजी सकाळी अकरा आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. गेवराई तालुक्यातील पाणलोट क्षेत्रात असलेल्या पीक परिस्थितीचा आढावा घेऊन, नवे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकर्यापर्यंत कृषी विकसित संकल्प घेऊन जाण्याला प्राधान्य देऊ आणि शासनाच्या योजनांचा लाभ शेतकर्यापर्यंत गेला पाहिजे.
यावर आपला भर राहील. गेवराई तालुक्यातील पाणलोट क्षेत्रात भाजीपाला, फुल शेतीचे प्रयोग करण्यात येतील, भूमिका नवनिर्वाचित तालुका कृषी अधिकारी किरण वीरकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मांडली असून, शेतकर्यांसाठी फार्मल आयडी आवश्यक आहे. सरकारी योजनेसाठी आयडी महत्त्वाचा आहे. म्हणून,
सर्व शेतकरी बांधवांनी ,आपला आयडी तयार करून घ्यावा. काही अडचण आल्यास थेट माझ्याशी किंवा तालुका कृषी कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे
आवाहन ही नवनिर्वाचित तालुका कृषी अधिकारी किरण वीरकर यांनी केले आहे. पदभार स्वीकारल्यानंतर गेवराई तालुका कृषी कार्यालयाचे
मंडळ कृषी अधिकारी सतिष केसभट, अश्विनी मस्के, उप कृषी अधिकारी काकासाहेब पंडित, राजेंद्र चव्हाण, राजेंद्र सांगळे, पठाडे तात्या यांनी त्यांचे स्वागत केले आहे.






