मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी डॉ. योगेश उत्तमराव साठे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची निवडीचे वृत्त जाहिर झाल्यानंतर, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्या निवडीचे स्वागत केले जात असून, समाजाच्या विविध घटकांमधून नवनिर्वाचित व्यवस्थापकीय संचालकपदावर डॉ. योगेश साठे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
डॉ. साठे हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन कार्य करणारे नामवंत अभियांत्रिकी तज्ज्ञ आहेत. 2010 साली त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील सर्वोच्च 'विद्या वाचस्पती' [ पीएच.डी ] पदवी प्राप्त केली आहे. ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी, ऊर्जा मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून परीक्षेद्वारे 'ऊर्जा व्यवस्थापक' म्हणून मान्यता मिळवली असून, राज्य व केंद्र सरकारच्या 50 हून अधिक प्रकल्पांवर सल्लागार म्हणून कार्य केले आहे.
डॉ. साठे हे 2018 पासून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे विभाग प्रमुख (कर्मशाळा व भांडार ) या पदावर कार्यरत असून, त्यांचा १५ वर्षांहून अधिकचा प्रशासकीय व शैक्षणिक अनुभव आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निकषांनुसार विभागप्रमुख पदाचा अनुभव “प्रशासकीय अनुभव” म्हणून ग्राह्य धरला जातो.
डॉ. साठे यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तांत्रिक शिक्षणाशी संबंधित योजनांमधून गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना सरकारी संस्थांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. याशिवाय, महामंडळाचे कामकाज पूर्णपणे डिजिटल करण्याचा आणि गरिबांना फाईलभोवती हेलपाटे घालण्यापासून मुक्त करण्याचा त्यांचा संकल्प आहे.
या पार्श्वभूमीवर, डॉ. साठे यांची नियुक्ती, दलित व वंचित समाजाच्या हितासाठी आणि महामंडळाच्या पारदर्शक, तांत्रिक व प्रभावी व्यवस्थापनासाठी अत्यंत आवश्यक व योग्य पाऊल मानले जात आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी डॉ. योगेश उत्तमराव साठे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची निवडीचे वृत्त जाहिर झाल्यानंतर, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्या निवडीचे स्वागत केले जात असून, समाजाच्या विविध घटकांमधून नवनिर्वाचित व्यवस्थापकीय संचालकपदावर डॉ. योगेश साठे यांची निवड झाल्याबद्दल, गेवराई येथील सामाजिक कार्यकर्ते, माजी नगराध्यक्ष ब्रम्हदेव धुरंधरे, रणजित सराटे, रंजीत खाजेकर, सुनिल सुतार सर , मायकल सुतार, राहुल सुतार, राणा कानडे, प्रदीप कांबळे ,महादेव पाटोळे व ज्येष्ठ पत्रकार सुभाष सुतार यांनी अभिनंदन केले आहे.






