यवतमाळ –
जिल्हा परिषदेच्या होतकरू व मेहनती विद्यार्थ्यांना जेईई- सीईटीची तयारी करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून एक नाविन्य पूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला असून, चांदा ज्योती सुपर शंभर या निवासी अभ्यासिका चे उद्घाटन पार पडले . ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडवण्याच्या हेतूने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून अकरावी व बारावीचे प्रत्येकी ५० अशा एकूण शंभर विद्यार्थ्यांच्या निवड प्रक्रियेनंतर दर्जेदार प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या विद्यार्थ्यांची निवड परीक्षेद्वारेच व्हावी, कोणतीही शिफारस मान्य करण्यात येऊ नये, तसेच नीट आणि जेईई पुरते मर्यादित न राहता स्पर्धा परीक्षांचेही मार्गदर्शन या केंद्रातून व्हावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमास आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा , जी. सी., मनपा आयुक्त विपिन पालीवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मीना साळुंखे, शिक्षणाधिकारी राजेश पातळे, अश्विनी सोनवणे आदींची मान्यवर उपस्थिती होती.






