बीड – (जिमाका) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या बीड जिल्हा माहिती कार्यालयाकडून जिल्ह्यातील पत्रकारांसाठी एकदिवसीय कार्यशाळा रविवार, 20 जुलै 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सकाळी 10.30 वाजता शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सभागृहात होणार आहे.
मूळ वर्धा जिल्ह्यातील व सध्या परभणीमध्ये जिजाऊ ज्ञानतीर्थ महाविद्यालयात शिक्षक असलेले दीपक रंगारी ‘वृत्तसंकलन-संपादनात शुद्धलेखनाचे महत्त्व’, माध्यम तज्ज्ञ आणि पत्रकारितेची पायवाट आणि संरक्षण पत्रकारिता या ग्रंथांचे लेखक प्रा. शिवशंकर पटवारी ‘कृत्रिम बुद्धीमत्ता आणि पत्रकारिता’ या विषयावर तर ‘समाज माध्यमांसाठी लेखन कौशल्ये’ यावर छत्रपती संभाजी नगर येथील माध्यम तज्ज्ञ डॉ. प्रभू गोरे मार्गदर्शन करणार आहेत.
अधिस्वीकृती नियमावली, आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना, शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी आदी पत्रकारांसाठी असलेल्या योजनांबाबत प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. श्याम टरके माहिती देणार आहेत. या कार्यशाळेत सर्व पत्रकार बांधवांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाकडून करण्यात आले आहे.






