गेवराई – बीड :
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या गेवराई येथील र.भ.अट्टल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागातील प्रा. महारुद्र जगताप यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मराठी विषयात पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे. प्रा. महारुद्र जगताप यांनी डॉ. विद्यासागर पाटंगणकर यांच्या मार्गदर्शनात ‘प्राचार्य राम शेवाळकर यांच्या साहित्याचा सर्वांगीण अभ्यास’ या विषयावर आपला शोध प्रबंध विद्यापीठास सादर केला.
प्रा. महारुद्र जगताप यांच्या या यशाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आ. प्रकाश सोळंके, उपाध्यक्ष अमरसिंह पंडित, सरचिटणीस आ. सतीश चव्हाण, महाविद्यालय विकास समिती सदस्य यांनी अभिनंदन केले.
या यशाबद्दल र. भ. अट्टल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर रजनी शिखरे यांच्या हस्ते प्रा. महारुद्र जगताप यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आयक्यूएसी समन्वयक डॉ. बालाजी रुपनर, डॉ. हनमंत हेळंबे, ग्रंथपाल डॉ. रणजीत पागोरे, डॉ. आर. ए. चौहान, डॉ. प्रदीप गायकवाड, डॉ. सुनील भगत, डॉ. समाधान इंगळे, डॉ. केचे, प्रा. शरद सदाफुले, आदींची उपस्थिती होती.
उपप्राचार्य डॉ. विजय सांगळे, डॉ. प्रशांत पांगरीकर, प्रबंधक भास्कर सुरवसे, कार्यालयीन अधीक्षक भागवत गवंडी यांच्यासह सर्व प्राध्यापक, कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.






