गेवराई – बीड :
गेवराई तालुक्यातील काही कृषी दुकानदार खताची टंचाई निर्माण करून, गोरगरीब शेतकर्यांची लूट करीत आहेत. युरिया खत उपलब्ध असून देखील, ते दिले जात नाही. त्यासाठी जास्तीच्या पैशाची मागणी केली जात आहेत. गेवराई तालुका कृषी अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन, कृषी दुकानदारांना कडक समज द्यावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
दरम्यान, गेवराई तालुक्यातील खत विक्रेत्यांसाठी खत विक्रीच्या संदर्भात कडक सूचना देण्यात आलेल्या आहेत. सर्व दुकानदारांनी शेतकर्यांची अडवणूक करू नये, नसता कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा गेवराई तालुका कृषी कार्यालयाच्या क्वालिटी निरीक्षक अश्विनी मस्के यांनी दिला आहे.
या संदर्भात, गेवराई तालुका कृषी विभागाच्या क्वालिटी निरीक्षक
अश्विनी मस्के यांनी गेवराई तालुक्यातील किरकोळ रासायनिक खत विक्रेत्यांना कडक निर्देश दिले आहेत. खत दुकानदारांनी अनुदानित रासायनिक खतांची विक्री, ही ई-पॉस प्रणालीच्या माध्यमातून करायची आहे. तसे करणे बंधनकारक आहे.
खत विक्रीच्या नोंदी तात्काळ आणि अचूक पद्धतीने करून घ्यायच्या आहेत. ई-पॉस स्टॉक व प्रत्यक्ष साठा समान दिसून आला पाहिजे. खत साठा व प्रत्यक्ष गोडाऊन मधील साठा यामध्ये कोणतीही तफावत आढळून आल्यास, कोणाचीही गय करण्यात येणार नाही. नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल. तसेच, नियमित तपासणी साठी क्षेत्रीय स्तरावरील खत निरीक्षकांना निर्देश देण्यात आले आहेत. अशी माहिती ही श्रीमती मस्के यांनी दिली आहे.
दरम्यान, गेवराई तालुक्यातील काही कृषी दुकानदार खताची टंचाई निर्माण करून, गोरगरीब शेतकर्यांची लूट करीत आहेत. युरिया खत उपलब्ध असून देखील, ते दिले जात नाही. युरिया खतासाठी अधिकचे पैसे देणारांना खत उपलब्ध करून दिले जात असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, गोरगरीब
शेतकर्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येतात. त्यामुळे, अनेक शेतकर्यांना वेळेत खत मिळाले नाही. गेवराई तालुका कृषी अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन, कृषी दुकानदारांना कडक कारवाई करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.






