गेवराई – बीड :
शिवसेना पक्षाकडून, बीड जिल्ह्य़ातील युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या असून, युवा सेनेच्या गेवराई विधानसभा अध्यक्ष पदी युवा नेते उमेश शिंदे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
शिवसेनेचे प्रमुख
नेते एकनाथराव शिंदे यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाच्या बुचासेना बीड जिल्हा पदाधिकारी जाहीर करण्यात आली असून, गेवराई विधानसभा अध्यक्षपदी उमेश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे प्रसिद्धी पत्रक शिवसेना मध्यवर्ती भवनातून प्रसिद्धीस देण्यात आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने संघटनात्मक बदल केले आहेत. युवा सेना गेवराई तालुका अध्यक्षपदी उमेश यांना संधी देण्यात आली आहे. शिंदे हे गेली अनेक वर्षे राजकिय सानाजिक क्षेत्रात काम करीत आहेत. गेवराई तालुका स्तरावर युवकांसाठी विविध उपक्रम राबवणे, जनतेच्या समस्या सोडवणे अशी अनेक कामांमध्ये त्यांचा पुढाकार राहीला आहे. भविष्यात ही, विविध
उपक्रम राबवून युवकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष उमेश शिंदे यांनी सांगितले. युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची
नियुक्ती शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली
करण्यात आली आहे. ग्रामीण भागात काम करणाऱ्या युवा कार्यकर्त्याला संधी मिळाल्याने,युवा सेनेचे
गेवराई विधानसभा अध्यक्ष उमेश शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






