गेवराई – बीड : येथील राज्य परिवहन मार्ग महामंडळातील गेवराई आगाराचे निवृत्त अधिकारी पांडुरंग विठ्ठलराव कुलकर्णी (सुर्डीकर ) यांचे गुरुवार ता. १४ ऑगस्ट रोजी सकाळी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८२ वर्षे होते. जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक
विशाल कुलकर्णी यांचे ते वडील होत. त्यांच्यावर गुरूवारी सायंकाळी, शहरातील चिंतेश्वर स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समाजबांधव उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात मुलगा विशाल , विवाहित मुली, सुन, नातवंडे असा मोठा परिवार आहे. गेवराई बस आगारातील एक उत्कृष्ट अधिकारी म्हणून पांडुरंग कुलकर्णी यांची ओळख होती. बस आगारात नियंत्रक पदावर कार्यरत असताना, त्यांनी उत्कृष्ट काम केले होते.
त्यांना तात्या नावाने ओळखले जात होते.
ते मितभाषी होते. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.






