गेवराई – बीड : गेवराई येथील सामाजिक कार्यकर्ते
मुश्ताक छोटु मिया कुरैशी यांची खाटीक समाज सेवा संस्थेच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी मुश्ताक कुरैशी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मुस्लिम खाटीक समाज सेवा संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष हाजी अराफत शेख यांच्या आदेशानुसार सदरील निवड करण्यात आली असून, त्यांच्या निवडीचे जिल्हाभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले आहे.
मुश्ताक कुरैशी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक चळवळीत सक्रिय आहेत. विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यांच्या कार्याची दखल घेऊन, राज्य मुस्लिम खाटीक समाज सेवा संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी, कुरैशी यांच्यावर बीड जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली असून,
राज्य मुस्लिम खाटीक समाज सेवा संस्था ही कुरैशी समाजाच्या उत्थानासाठी, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी कार्यरत आहे. आपल्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यात संस्थेच्या उद्दिष्टांना गती मिळेल आणि समाजाच्या कल्याणासाठी आपण महत्त्वपूर्ण योगदान द्याल, असा विश्वास नियुक्त पत्रकातून व्यक्त करण्यात आलेला आहे. दरम्यान, गेवराई येथील सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक छोटू मिया कुरैशी यांची खाटीक समाज सेवा संस्थेच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी मुश्ताक कुरैशी निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा मराठवाडा संपर्क प्रमुख जावेद कुरेशी यांनी दिले आहे. नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष कुरैशी यांचे
जिल्हाभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले आहे.






