गेवराई – बीड : गेवराई शहरात व परिसरात 18 ऑगस्ट 2025 रोजी
वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात
गेवराई येथील शेतकरी नारायण किसन कानगुडे रा. गेवराई जि.बीड यांच्या शेतातील शक्ती कंपनीच्या सोलार प्लेटला तडे गेल्याने सोलारचे नुकसान झाले आहे. सदरील शेतकर्याने कंपनीच्या कार्यालयात तक्रार केली असून, सोलार पंपाच्या प्लेटच्या झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. नारायण कानगुडे यांचे स.न. 92 मध्ये शेत असून, या शेतात शक्ती कंपनीचे सोलार बसविण्यात आलेले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात सोलार पंपाच्या प्लेटचे नुकसान झाले आहे.






