सिंदफणा परिसरात शिक्षण, समाजकारण आणि कृषी क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या उल्लेखनीय व्यक्तिमत्त्वांपैकी एक नाव म्हणजे शिवाजीभाऊ रांजवण पाटील. जीवनमूल्यांचा ठेवा, समाजसेवेची तळमळ आणि शिक्षण क्षेत्रातील दूरदृष्टी या गुणांच्या आधारावर त्यांनी आपल्या कार्याची भक्कम ओळख निर्माण केली आहे.
सिंदफणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला आहे. ग्रामीण व शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. शुभमंगल मल्टीस्टेटचे यशस्वी अध्यक्ष म्हणून ग्रामीण भागातील आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांनी ठोस पावले उचलली. कार्यारंभ पेपरचे मुख्य संपादक म्हणून समाजातील घडामोडींना बांधिलकीने व सामाजिक जबाबदारीने हाताळले. सुंदररावजी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व शेती विभागाचे अध्यक्ष म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी मोलाची भूमिका बजावली. माजलगाव नगर परिषदेच्या सभागृहात
नगरसेवक म्हणून लोकहिताचे अनेक उपक्रम राबवले.
ते धार्मिक वत्तीचे आहेत.
अध्यात्मिक विचार आणि ईश्वरनिष्ठा यामुळे त्यांना समाजकार्यात सतत प्रेरणा मिळाली. “आरोग्य हेच खरे धन” या विचारांचा स्वीकार करून त्यांनी वैयक्तिक जीवनात आरोग्य आणि शरीरसौष्ठवावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. नियमित व्यायाम, शिस्तबद्ध जीवनशैली आणि सकारात्मक विचारसरणी हे त्यांच्या जीवनाचे आधारस्तंभ आहेत.
त्यांचे व्यक्तिमत्त्व शांत, संयमी व तेजस्वी आहे. लोकांशी साधेपणाने वागणे, निर्णय घेताना संयम बाळगणे आणि सर्वसामान्य माणसांच्या हिताचा विचार ठेवणे ही त्यांची खास वैशिष्ट्ये आहेत. ते प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे.
डॉ. सोनाजीराव रांजवण यांचे ज्येष्ठ सुपुत्र आहेत. घरातूनच शिक्षण, समाजकारण आणि सहकार चळवळीची प्रेरणा मिळाली. वडिलांच्या कार्याचा वारसा जपत सिंदफणा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून समाजातील शैक्षणिक व सामाजिक कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, शेतकऱ्यांना मार्गदर्शन व समाजातील दुर्बल घटकांना आधार मिळावा, यासाठी ते सातत्याने कार्यरत असतात. शनिवार ता. 13 जूलै रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, यशस्वी वाटचाल आणि समाजकार्यासाठी अखंड प्रेरणा लाभो हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना.
लेखक –
दिगांबर गायकवाड, नित्रुडकर






