Loksamvad News | लोकसंवाद न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • गेवराई
  • राजकारण
  • मनोरंजन
  • विश्लेषण
  • क्राईम
  • कृषी विशेष
  • शिक्षण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • गेवराई
  • राजकारण
  • मनोरंजन
  • विश्लेषण
  • क्राईम
  • कृषी विशेष
  • शिक्षण
  • संपादकीय
No Result
View All Result
Loksamvad News | लोकसंवाद न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • गेवराई
  • राजकारण
  • मनोरंजन
  • विश्लेषण
  • क्राईम
  • कृषी विशेष
  • शिक्षण
  • संपादकीय

अतिवृष्टीचा थरार – उमापुर गावात त्या रात्री काय घडलं…!

संपादक सुभाष सुतार by संपादक सुभाष सुतार
September 24, 2025
in महाराष्ट्र
अतिवृष्टीचा थरार – उमापुर गावात त्या रात्री काय घडलं…!

त्या रात्री पावसाने अक्षरश थैमान घातलं.. सुदैवाने मी माहेरी आले होते. भाऊ ही आला होता.नसता, त्या भयान रात्री आई-वडील दोघेच घरी असते तर काय झाल असते…नुसता विचार मनात आला तरी, जीवाची घालमेल होते. पण, हे का झाल, कोण जबाबदार आहे..या सर्व घटनेला, याचं उत्तर मिळेल की नाही. त्या मुसळधार पावसात आम्ही कसे वाचलो, देवालाच माहित..! आई-वडीलाच्या काळजीनं कासावीस झालेल्या एका उच्च शिक्षित, पेशाने डॉक्टर असलेल्या मुलीने लिहिलेले आत्मकथन संवेदनशील माणसाला अंतर्मुख करायला भाग पाडते..! संपादक- सुभाष सुतार

21 सप्टेंबर 2025 ची मध्यरात्र कधीही विसरण्यासारखी नाही. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात माझं माहेर असलेल्या उमापुर गावावर निसर्गाने रौद्र रूप दाखवलं. गेल्या कित्येक पिढ्या आमचा परिवार या गावात राहत आला आहे. मारोती मंदिराजवळ, वेशीबाहेर आमचं घर आहे. घराजवळून वाहणाऱ्या लेंडी नाल्याचं पाणी किंवा समोरच्या बारवेतून आलेलं पाणी आमच्या घरात कधी शिरलं नाही. माझ्या वडिलांचं वय आज 57 वर्षं आहे, ते सांगतात की त्यांच्या आयुष्यात असा प्रसंग कधीही घडला नव्हता.

पण गेल्या काही वर्षांत गावात अतिक्रमणं झाली, सिमेंटची सार्वजनिक बांधकामं झाली आणि नाल्याचा नैसर्गिक प्रवाह अडू लागला. परिणामी, पावसाचं पाणी साठून राहू लागलं आणि त्याला घाण गटारीचं स्वरूप आलं. त्यामुळे डास, किडे आणि विषारी जीव घरात येऊ लागले. आमच्या घरच्यांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रार केली, पण फारसा उपयोग झाला नाही. शेवटी स्वतःच्या खर्चाने वडिलांनी घराजवळ गॅलरी बांधली, पण परिस्थिती दिवसेंदिवस बिकटच होत गेली.


भीषण रात्र

त्या रात्री मी, माझी अडीच वर्षांची मुलगी, आई-वडील व भाऊ घरी होतो. मुसळधार पावसामुळे हळूहळू घरात पाणी शिरू लागलं. घरात पाणी कधीच न आल्याने आम्ही हतबुद्ध झालो. बाहेर पडण्यासाठी दार उघडलं तर अजून जास्त पाणी आत घुसलं. काही क्षणातच पाणी बेडवर आलं. इन्व्हर्टर बंद पडले, सगळं अंधारमय झालं.

त्या अंधारात लेकराला हातात घेऊन आम्ही कमरेपर्यंत पाण्यातून कसाबसा शेजारच्या काकांच्या घरी गेलो. ५-६ तास हा थरार सुरू होता. काकांच्या घरीसुद्धा पाणी शिरलं होतं. सकाळ झाली तेव्हा घरातलं दृश्य अवर्णनीय होतं – अन्नधान्य, महागड्या वस्तू, रोकड, कपडे – सगळ्याचं प्रचंड नुकसान झालं होतं.


या प्रसंगाचं गांभीर्य

आई-वडील अजूनही त्या घरातच आहेत. मी लेकराच्या सुरक्षिततेसाठी नाईलाजाने माहेर सोडून आले. पण मन मात्र तिथेच अडकलंय. गावातील नातेवाईक, प्रतिष्ठित मंडळी, आप्तेष्ट यांनी धीर दिला, मदत केली – त्याबद्दल आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत.

पण या संकटाचं मूळ कारण प्रशासनाने गंभीरतेने घेणं अत्यावश्यक आहे. आजतागायत न घडलेली गोष्ट – घरात पाणी शिरणं – ही का घडली? याचं उत्तर अतिक्रमणं व चुकीच्या सार्वजनिक बांधकामांत दडलं आहे. आज आमचं कुटुंब बाधित झालं, उद्या कोणाचं होईल सांगता येत नाही.


प्रशासनाला विनंती

आमच्या कुटुंबाचं आणि गावातील इतर घरांचं झालेलं नुकसान पैशाने भरून निघणं कठीण आहे. पण तरीही शासनाने नुकसानभरपाईची तरतूद करावी, पंचनामे करून मदत मंजूर करावी ही अपेक्षा आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे –

लेंडी नाल्यावरील अतिक्रमणं दूर करावीत.

चुकीची सार्वजनिक बांधकामं दुरुस्त करावीत.

नैसर्गिक पाणीप्रवाह मोकळा करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.

जेणेकरून उमापुरसारख्या गावातील कोणत्याही कुटुंबाला पुन्हा असं भयाण संकट सहन करावं लागू नये.


शेवटची हाक

माझे आई-वडील, सौ. सविता काकू मुळे व श्री. प्रमोद काका मुळे, हे गावात सर्वांना परिचित आहेत. त्यांच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबांनी गावाशी नाळ जोडलेली आहे. त्यामुळे गावातील प्रतिष्ठित मंडळी, नागरिक आणि प्रशासन – सगळ्यांनी एकत्र येऊन या प्रश्नावर ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे.

ही वेळ केवळ आमच्या कुटुंबाची नाही, तर संपूर्ण गावाच्या सुरक्षिततेची आहे.
आपण आज आवाज उठवला तर उद्या अश्रू टाळता येतील.

🙏
डॉ. सौ. रुचिरा मुळे-कुलकर्णी
डॉ. कौस्तुभ प्रमोदराव मुळे [ उमापूर, ता. गेवराई जि.बीड ]


Previous Post

नांदूर हवेली गावाला पाण्याचा वेढा, दिंडे वस्तीवर वीस लोक अडकले, चिंतेचे वातावरण

Next Post

कु. अनुजा राऊत – युवा महोत्सवात लाभलेली गोड गळ्याची गायिका….!

संपादक सुभाष सुतार

संपादक सुभाष सुतार

Next Post
कु. अनुजा राऊत – युवा महोत्सवात लाभलेली गोड गळ्याची गायिका….!

कु. अनुजा राऊत - युवा महोत्सवात लाभलेली गोड गळ्याची गायिका….!


ताज्या बातम्या

आमन सुतार यांना स्वीकृत सदस्य म्हणून काम करण्याची संधी द्या – मातंग समाजाची मागणी

आमन सुतार यांना स्वीकृत सदस्य म्हणून काम करण्याची संधी द्या – मातंग समाजाची मागणी

December 28, 2025
पोलीस ठाण्यात हजर होताच बाळराजे पवार यांच्यावर अटकेची कारवाई

बाळराजे पवार – सिर्फ नाम ही काफी है…!

December 21, 2025
कायदा हातात घेऊ नका, गेवराई पोलीस ॲक्शन मोडवर , शहरात तगडा बंदोबस्त – पोनि. किशोर पवार

कायदा हातात घेऊ नका, गेवराई पोलीस ॲक्शन मोडवर , शहरात तगडा बंदोबस्त – पोनि. किशोर पवार

December 20, 2025
गेवराईत थरार – पोलीसांचे कौतुक,

गेवराईत थरार – पोलीसांचे कौतुक,

December 18, 2025
जामीन मंजूर  – बाळराजे पवार अटक प्रकरण

जामीन मंजूर – बाळराजे पवार अटक प्रकरण

December 17, 2025
पोलीस ठाण्यात हजर होताच बाळराजे पवार यांच्यावर अटकेची कारवाई

पोलीस ठाण्यात हजर होताच बाळराजे पवार यांच्यावर अटकेची कारवाई

December 16, 2025
  • Contact Us
  • About Us

© 2025. Website Development Mahesh Vispute (Beedkar) : 9822318809

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • गेवराई
  • राजकारण
  • मनोरंजन
  • विश्लेषण
  • क्राईम
  • कृषी विशेष
  • शिक्षण
  • संपादकीय

© 2025. Website Development Mahesh Vispute (Beedkar) : 9822318809

Join WhatsApp Group