गेवराई : दि. 21 : वार्ताहर : गेवराई येथील शिव शारदा पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी मोमीन आशमिरा आवेज शरिफ हिची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली असून,
ती, बीड जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे. तिच्या निवडीचे जिल्हाभरात स्वागत करण्यात येत आहे.
36 वी किशोर , किशोरी गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा 5 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 2025 रोजी राकेश भाऊ घुले क्रीडांगण, बोपखेल गाव, पुणे येथे पार पडणार असून, शिव शारदा पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी मोमीन आशमिरा आवेज शरिफ हिची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ती बीड जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे. तिच्या निवडीचे स्वागत करण्यात येत असून, क्रिडा विभागातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शिव शारदा पब्लिक स्कूल संस्थेचे
अध्यक्ष माजी आमदार अमरसिंह पंडित, सचिव जयसिंग पंडित, आमदार विजयसिंह पंडित,
शारदा क्रीडा अकॅडमीचे अध्यक्ष रणवीर पंडित, पृथ्वीराज पंडित,
शाळेचे मुख्याध्यापक संतोषकुमार अन्नम, मार्गदर्शक तथा क्रीडा शिक्षक ज्ञानेश्वर धापसे, विद्या मॅडम
यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून भविष्यातील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.






