गेवराई – बीड : भीम आर्मीचे मराठवाठा अध्यक्ष संजय शेषराव जाधव [ वय वर्ष 55 ] रा. गेवराई जि.बीड यांचे सोमवार ता. 10 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी नऊ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे. येथील व्यावसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते रंजीत सराटे यांचे ते मेहूणे होत.
संजय जाधव हे, गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया ही झाली होती. मात्र, अचानक त्यांना त्रास झाल्याने त्यांचे निधन झाले. सोमवारी दुपारी संजय जाधव यांच्यावर मांगीरबाबा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मंडळी, समाजबांधव उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले , एक मुलगी आहे. भीम आर्मीचे मराठवाठा अध्यक्ष म्हणून त्यांनी मोठी चळवळ उभी केली होती. विविध सामाजिक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग राहीला होता. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.






