गेवराई : नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी गेवराई शहरात निर्माण झालेल्या पवार – पंडित राडा प्रकरणात कलम वाढ झाल्याने भारतीय जनता पक्षाचे युवा नेते बाळराजे पवार यांना पोलीसांनी सोमवार ता. 15 रोजी रात्री अटक केली.
पोलिसांच्या सांगण्यावरून स्वतः पवार, पोलीस ठाण्यात हजर झाले होते. ते हजर होताच पोलिसांनी त्यांना अटक केली. राजकारणात स्वच्छ प्रतिमा, कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे नाते आणि जनतेशी थेट संवाद ठेवणारे नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या
बाळराजे पवारांना अटक झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने खळबळ उडाली असून, शहरातील नागरिकांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दरम्यान, मंगळवार ता. 16 रोजी दुपारी पवार यांना गेवराई न्यायालयात हजर करण्यात आले असता, मा. न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडीत दिली आहे. बाळराजे पवार यांना अटक करण्यात आल्यानंतर गेवराई शहरात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, हितचिंतकांनी पोलीस ठाण्यात व न्यायालयात गर्दी केली होती. या प्रकरणात गेवराई पोलीसांनी बंदोबस्त ठेवला आहे. शहरात शांतता असून, लोकशाहीवर आपला विश्वास असल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले आहे. दरम्यान, बुधवार ता. 17 रोजी गेवराई न्यायालयाने जामीन मंजूर करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आली आहे.
गेवराई नगर परिषदेच्या निवडणूकीसाठी दि २ डिंसेबर रोजी मतदान सुरू असताना प्रभाग क्रंमाक 10 मधिल उर्दूशाळेतील बूथवर पंडित – पवार यांचे युवराज एकमेकांना भिडले होते. त्यांनतर माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या कृष्णाई संपर्क कार्यालयात स्वीय सहाय्यक सहाय्यक अमृत डावकर यांना मारहान झाली होती. त्यानंतर बाळराजे पवार यांच्या निवासस्थानावर दगडफेक करून, चार चाकी गाडी फोडली होती. या मध्ये चार ते पाच लोकांना गंभीर इजा झाली होती. पोलीसांनी दोन्ही गटातील लोकांवर गुन्हे दाखल केले होते. या सगळ्या प्रकरणात बीड पोलिस अधीक्षक नवनित कॉवत यांनी कायदेशीर व पारदर्शक भूमिका बजावली होती. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना अटक झाली होती. दरम्यान,
या गुन्ह्यात अतिरिक्त कलम वाढविले असल्याने गेवराई पोलिसांनी बाळराजे पवार यांच्यासह चौघांना
रात्री उशीरा अटक केली. दरम्यान, मंगळवार ता. 16 रोजी पोलीसांनी बाळराजे पवार व इतरांना गेवराई
न्यायलयात हजर केले असता, मा. न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.या प्रकरणात गेवराई पोलिसांनी फिर्याद दाखल करून, गूरनं 771/2025 गुन्ह्यात 333 हे अतिरिक्त कलम वाढविले आहे. त्यामुळे, बाळराजे पवार यांच्यासह चौघांना गेवराई पोलिसांनी सोमवारी अटक केली होती. राजकारणात स्वच्छ प्रतिमा, कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे नाते आणि जनतेशी थेट संवाद ठेवणारे नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या
बाळराजे पवारांना अटक झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने खळबळ उडाली असून, शहरातील नागरिकांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दरम्यान, मंगळवार ता. 16 रोजी दुपारी पवार यांना गेवराई न्यायालयात हजर करण्यात आले असता, मा. न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडीत दिली आहे. बाळराजे पवार यांना अटक करण्यात आल्यानंतर गेवराई शहरात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, हितचिंतकांनी पोलीस ठाण्यात व न्यायालयात गर्दी केली होती. या प्रकरणात गेवराई पोलीसांनी बंदोबस्त ठेवला आहे. शहरात शांतता असून, लोकशाहीवर आपला विश्वास असल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले आहे.






