अपयशाच्या माथ्यावर पाय रोवून ते उभे राहीलेत. असंख्य संकटांचा नेटाने सामना करून, ते चालते झालेत. त्यागाला आपल्या स्वभाव धर्माशी जोडून, स्व-कर्तृत्वाला सामाजिक अर्थ प्राप्त करून दिला आहे. ते शहराचे वैभव राहीलेत. एकूणच त्यांच व्यक्तिमत्त्व प्रभावशाली आहे. त्यांचे, कोणत्याही विषयावरचे सर्व समावेशक ज्ञान व्यक्तीला भारावून टाकते. त्यांच्यावर जीव ओवाळून टाकावा, इतके सहज सुंदर वर्णनाचे धनी राहीलेल्या
बाळराजे माधवराव पवार यांचा 21 डिसेंबर 2025 रोजी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने एका प्रभावशाली व्यक्तिमत्वाला शब्दात गुंफण्याचा प्रयत्न केला आहे.
दुग्धशर्करा योग म्हणजे, कायदेशीर अडसर दूर करून सुखरूप बाहेर आलेल्या बाळराजे पवार यांच्या धर्मपत्नी सौ. गिता बाळराजे पवार ह्या गेवराई जि.बीड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. त्यांच्या निकालाचा फैसला ही 21 डिसेंबर रोजी आहे. त्यांच्या वाढदिवसाची अविस्मरणीय गिफ्ट म्हणून गेवराईकर गिताभाभींना आशीर्वाद देतील, अशी अपेक्षा आहे.
भारतीय जनता पक्षाचे युवा नेते बाळराजे पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्याशी सुसंवाद साधता आला.
विविध विषयावर बोलता आले. तुम्ही जेवढ द्याल, तेवढे ते वाढत जाते, या संचित न्यायाने बाळराजे यांनी मराठवाड्याच्या राजकीय पटलावर नवा अध्याय कोरलाय. सामाज परीवर्तनाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकणारे गेवराई चे पाटील लोकहितवादी पुढारी म्हणून पात्र राहीलेत.
गेवराई चे ( बीड ) पाटील तथा
माजी आमदार माधवराव पवार यांचे ते थोरले चिरंजीव आहेत. घरात राजकीय वारसा होता. आजोबा शाहुराव पाटील, वडील माधवराव पवार आमदार होते. नवल म्हणजे, त्यांचे प्रिय बंधू महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत दोन वेळा आमदार राहीलेत.
बाळराजे यांचे प्राथमिक – उच्च माध्यमिक शिक्षण पुण्यातल्या कडक शिस्त असलेल्या शिवाजी मिलिट्री स्कूल मध्ये झाले. ते मराठी, इंग्लिश, हिंदी साहित्याचे अभ्यासक आहेत. वाचनाचा त्यांना भलता छंद आहे.
असंख्य पुस्तके त्यांनी वाचून काढलीत.
ते जेव्हा बोलत रहातात. आपण, नुसतं ऐकत राहावे वाटते. कोणताही विषय असूदेत, त्याची सखोल माहीती, त्या विषयीची नेमकी समज, त्थातले अर्थकारण, राजकारण,आरोग्य, शेती अशा विविध विषयांवर ते टाॅप टू बाॅटम बोलत राहतात.
त्यांच्या मातुश्रींचा नगर परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर, पवारांच्या राजकारणाला पूर्ण विराम मिळाला, अशी चर्चा झाली. परंतू त्यांनी आईचा पराभव पचवला. समंजसपणा दाखवला, थोडा ही तोल जाऊ दिला नाही. मनात कटूतेचा कसलाही अंश न ठेवता, ते चालते झाले. खरच, हे एवढे अनाकलनीय होते. इतका भलेपणा असलेला राजकारणी, समाजकारणी युवा नेता लोकांनी पाहिला आणि पून्हा नवी उमेद देऊन उभा केला. राजकारणात सूड घेणे असते. त्याचा पदोपदी अनुभव आलेली माणसं तुम्ही आम्ही पाहिली आहेत. बाळराजे पवार अपवाद राहीलेत. त्या पलीकडी जाऊन, सर्व समावेशक अशी प्रतिमा त्यांनी निर्माण केली. त्यांच्यातला “कुल राजकारणी” पाहून अनेकांना नवल वाटते. त्यांच्या आईचा पराभव, नाही म्हणल तरी पवार कुटुंबाला धक्काच होता. अशा कठीण काळात ही, ते फिनिक्स पक्षा सारखे, पुन्हा उभे राहीले. पाटील घराणे, या पुढे नावालाच राहील ; अशी अटकल लावली गेली. ते खरे ही वाटायचे. त्यांच्या भोवती अनेक गतिरोध होते. लोकांनी नाकारले होते. तेव्हा, विरोधी बाकावर बसून जेवढ करता येईल तेवढे करू नसता, शांत बसू. एवढी एकच गोष्ट त्यांनी लक्षात ठेवली. तो अतिशय कठीण काळ होता. काळा बरोबर अनेकांनी पाठ दाखवली. काहीनी वाटा बदलल्या. मात्र, जीवाभावाच्या माणसांनी दुरून का होईना, स्नेह ठेवला. त्यामुळेच त्यांचा आत्मविश्वास कायम राहीला. काय असत की, सगळच कधी संपत नसत. जगाच्या नकाशात अवकाश असतो. एक पेस असतोच असतो. कुठे तरी एखादी पोकळी असतेच, तिला शोधायचा प्रयत्न तुम्ही करत राहीलात ना, संधी येते आपोआप. दादांच्या बातमीत ही तेच झाले. देवाने परीक्षा घेतली. ते उत्तीर्ण झाले.
जेष्ठ लेखक उत्तम कांबळे व्याख्यानात म्हणायचे, काहींना उघडी दारे सुद्धा बंद दिसू लागतात, अशा वेळी आपण संपलोय, असे जेव्हा वाटायला लागते. तेव्हा आपण स्वत:चे अस्तित्व विसरतो.
बाळराजे, या गोष्टीला अपवाद राहीले. डोळस पणा कायम ठेवला. एका बिंदूशी चिटकून राहून पेस शोधायचा प्रयत्न केला आणि त्यांना यश मिळाले. आदळआपट, थयथयाट केला नाही. संधीची वाट पाहीली. त्यांच्या नेतृत्वाखाली 58 नगरसेवक, 6 नगराध्यक्षांना काम करण्याची संधी मिळाली. बेरोजगार तरूण कार्यकर्त्यांना व्यावसायिक मार्गदर्शन करून आधार दिला. गरीब जोडप्यांचे लग्न लावून दिले. एक ना अनेक किचकट विषय मार्गी लावलेत. त्यांची मध्यस्ती “सत्यम शिवम सुंदरम”, या वचनाला जागणारी राहीली आहे.
जातीचे बांध त्यांनी कधी उभे-आडवे केले नाहीत. त्यांना कामाचा कंटाळाच येत नाही. संपर्कात आलेला माणूस सहजा सहजी तुटत नाही. ही त्यांची जमेची बाजू आणि हातोटी आहे. या संदर्भात असंख्य उदाहरणे आहेत. मुद्दे व्यवस्थित पटवून देण्यात त्यांचा हातखंडा आहे.
खर म्हणजे, माणसाला वलय प्राप्त झाले की, त्याची छबी आवडायला लागते. त्यांच्यातला युवा राजकारणी नव्या पिढीला खुणावत राहायचा. त्यांनी पुस्तके वाचलीत, त्यामुळे माणसे वाचता आलीत. त्यांच बोलण, चालण, एकूणच त्यांची लकब कमालीचा प्रभाव पाडणारी आहे.
मानसशास्त्रात केश्मरने अशा बांधेसूध व्यक्तिमत्त्वावर भाष्य केले आहे. अशी माणसे, समाजसेवक म्हणून नावारूपास येतात, असे म्हटले आहे.
बाळराजे पवार यांच्या विषयी समाजात कमालीचे प्रेम, वात्सल्य, सहानुभूतीपूर्वक आपुलकी होती. त्यांना ती दिसली. अहंकाराचा लवलेश नसलेली पवारांची नवी पिढी म्हणजे, दैवी गिफ्ट म्हणता येईल.
गेवराईकरांनी विश्वास दाखवला. त्याची इतिहास नोंद झाली आहे. केवळ दादांची प्रतिभा लक्षात घेऊन, नागरीकांनी नगर परिषदेचे “साम्राज्य” त्यांच्या हाती दिले. मतदारसंघातील जवळपास तिनशे गावांनी पवार घराण्यावर विश्वास ठेवून, आबासाहेबांना ( अँड. लक्ष्मण पवार ) आमदार केले. एकदा नव्हे दोनदा, या विजयाला दादांचा स्पर्श आहे. ही बाब सुद्धा अधोरेखित करणारी आहे. हा आधुनिक युगातला चमत्कार आहे.
मी , दै. तरूण भारतचा वार्ताहर होतो. शहरात कार्यालय होते. मनात विचार यायचा, राजकारणाच्या मुख्य प्रवाहात बाळराजे येतील का ? अनेकांशी चर्चा व्हायची, दोन्ही बाजू ऐकायला मिळायच्या. द सिक्रेट मधला रान्डो आठवतो. तो अस म्हणतो, तुम्ही एखाद्या विषयी निरभ्र मनाने , काही तरी शुभ चिंतित असाल तर ते कधीना कधी पुढे येतेच. आपण निम्मित मात्र असतो. ते त्याचेच संचित असते. प्रारब्धाने ते त्यांच्या पुढ्यात येते. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात. उदाहरणार्थ, आबासाहेब आमदार होणं आणि सलग तिसऱ्यांदा नपची सत्ता मिळणे, या सगळ्या गोष्टीत “सिक्रेट” मध्ये आहे. जे रान्डो ने लिहून ठेवले आहे.
दादांच्या वाढदिवसानिमित्त खूप दिवसानी त्यांच्याशी बोलण्याचा योग आला. फोन करून विचारले तर ते म्हणाले, सुभाषराव…! या ना, मी वाट पहातोय.
दादा सांगत होते, माझ शिक्षण पुण्यात झाल. बारावी पर्यंत शिवाजी मिलिट्री स्कूल मध्ये होतो. लक्ष्मण अण्णा आणि मी पुढे मागेच होतो. भावा पेक्षा, आमच्याले मैत्रीचे नाते खूप छान होते. जगाच्या पाठीवर असा भाऊ मी पाहीला नाही. तेव्हा आणि आजही तेच नात आहे. शहरात आल्यावर सामाजिक उपक्रमात भाग घ्यायचो. घरात राजकीय वातावरण होते. सामाजिक कार्यात रस वाटायचा. आमचा मोठा ग्रुप होता. युवक काँग्रेस च्या चळवळीत काम केले आहे.
खर तर , मला बंडखोर वृत्ती आवडते. चापुलसी कोणाचीही नको वाटते. लोकशाहीत लोकांनी आपले हक्क न सोडता, स्वाभिमान ठेवून जगावे. कोणत्याही परिस्थितीत झुकू नये, कधी मोडू नये आणि आपण गुलाम आहोत. या पद्धतीने वागू नये. अहो, जेव्हा सार्वजनिक , अशा ठिकाणी जायचा योग यायचा. तिथे गेलो की कर्मचारीवर्ग कमालीचा वाकायचा. नाही नाही, हे मला अजिबात पटत नाही. का झुकता ? कशासाठी ? आदर करणे वेगळी गोष्ट आहे. ती अशा पध्दतीने कोणी करत असेल तर मला आवडत नाही. हे अनेकदा बोलून दाखवायचो.
म्हणून मग, मीच सुरूवात केली. रभ अट्टल महाविद्यालयात स्थानिक मंडळावर मनातून काम करत असताना, रेग्युलर वर्गावर भर दिला. विद्यार्थ्यांकडून व्यक होणाऱ्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. चांगल्या शिक्षकांना पाठींबा दिला. प्राचार्य गाढवे सर येथे कार्यरत होते. कमालीचे प्रमाणीक आणि शिस्तीचे होते. त्यांना काम करायला मोकळीक दिली. चांगल्या कामाला आडवे येणारी माणसे सरळ केली. महाविद्यालयात विकासाचा निधी कसा आणि कुठे खर्च करण्यास पूर्ण अधिकार दिले. आम्ही पाठीशी राहून मदत केली.
सुभषराव, हे पहा, मला गच्चाळ, कपटी आणि हेतू ठेवून राजकारण करायला नको वाटते. सूडाचे राजकारण करणाऱ्या लोकांची चीड येते. लोकशाही आहे. कुणाचीही मक्तेदारी नाही. जिथे जायचे तिथे लोकांना जावू दिले पाहीजे. या जगात कोणी मोठ नसतं. आपले अस्तित्व अचानक तयार होत नाही. ते तयार करता येते. खूप सिम्पल गोष्ट आहे. “त्याग” करता आला पाहीजे. लालसा मोठी वाईट गोष्ट आहे. तिच्या पासून दूर राहता आले कि, कोणीही मोठा होऊ शकतो. पवार – पंडीतच पाहीजे, ही मोनोपल्ली कशाला ? तुमच्या समोरच उदाहरण आहे. आमदार लक्ष्मण पवार स्वकर्तृत्वावर निवडून आले की नाही. त्यांची रेषा ओलांडून जाता येईल ना, कोणी अडवलय. सत्तेच्या मागे धावणारे फक्त पळत असतात. त्याने सत्ता मिळत नाही. लोक सत्ता देतात. पण, तुमचे व्हिजन, तुमची आयडोलाॅजी कशी आहे. कोणासाठी आहे. मग, जनता पाठीशी राहते.
विकासाची दृष्टी ठेवून काम करणारी माणसे नव्या पिढीला हवीच आहेत.
जनतेचे खायचे , त्यांच्याकडे गुलाम म्हणून पहाणारी माणसे या मातीत उभी राहणार नाहीत, एवढी एकच इच्छा असल्याचे बाळराजे यांनी सांगितले. नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात विकास करता आला. अण्णाच्या माध्यमातून ग्रामीण भागात चांगली कामे झालीत. याचा आनंद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजकारणात कटुता विसरता आली पाहीजे. पाठीशी येत नाही म्हणून एखाद्यालावर सुड उगविणे, या सारखे पातक आयुष्यात आम्ही कधी केले नाही. केलेली विकास कामे पहायला जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे शहरात आले. त्यांनी पाठीवर कौतुकाची थाप मारून बळ दिल्याचा उल्लेख दादांनी यावेळी बोलताना केला.
दादा, विकासाला स्पर्श करणारी नवी दृष्टी तुम्ही तुमच्या कर्तृत्वावर निर्माण केली आहे. या अर्थाने, बाळराजे….! तुमच्या पावलांना प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. तिला जपा आणि वाढवा, त्यामध्ये तुमची स्वप्ने आहेत. जेष्ठांचा आशीर्वाद आणि नव युवकांच्या पाठिंब्यावर तुमच्या उराशी असलेली अनंत स्वप्न साकार होवोत, अशी मांगीरबाबाच्या चरणी प्रार्थना आहे. बाळराजे – सिर्फ नाम ही काफी है…!
अपयशाच्या माथ्यावर पाय रोवून ते उभे राहीलेत. असंख्य संकटांचा नेटाने सामना करून, ते चालते झालेत. त्यागाला आपल्या स्वभाव धर्माशी जोडून, स्व-कर्तृत्वाला सामाजिक अर्थ प्राप्त करून दिला आहे. ते शहराचे वैभव राहीलेत. एकूणच त्यांच व्यक्तिमत्त्व प्रभावशाली आहे. त्यांचे, कोणत्याही विषयावरचे सर्व समावेशक ज्ञान व्यक्तीला भारावून टाकते. त्यांच्यावर जीव ओवाळून टाकावा, इतके सहज सुंदर वर्णनाचे धनी राहीलेल्या
बाळराजे माधवराव पवार यांचा 21 डिसेंबर 2025 रोजी वाढदिवस आहे.
दुग्धशर्करा योग म्हणजे, कायदेशीर अडसर दूर करून सुखरूप बाहेर आलेल्या बाळराजे पवार यांच्या धर्मपत्नी सौ. गिता बाळराजे पवार गेवराई जि.बीड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. त्यांच्या निकालाचा फैसला 21 डिसेंबर रोजी आहे. त्यांच्या वाढदिवसाची अविस्मरणीय गिफ्ट म्हणून गेवराईकर गिताभाभींना आशीर्वाद देतील, अशी अपेक्षा आहे. भारतीय जनता पक्षाचे युवा नेते बाळराजे पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्याशी सुसंवाद साधता आला.
विविध विषयावर बोलता आले. तुम्ही जेवढ द्याल, तेवढे ते वाढत जाते, या न्यायाने बाळराजे यांनी मराठवाड्याच्या राजकीय पटलावर नवा अध्याय कोरलाय.
गेवराई चे ( बीड ) पाटील तथा
माजी आमदार माधवराव पवार यांचे ते थोरले चिरंजीव आहेत. घरात राजकीय वारसा होता. आजोबा शाहुराव पाटील, वडील माधवराव पवार आमदार होते. नवल म्हणजे, त्यांचे प्रिय बंधू महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत दोन वेळा आमदार राहीलेत.
बाळराजे यांचे प्राथमिक – उच्च माध्यमिक शिक्षण पुण्यातल्या कडक शिस्त असलेल्या शिवाजी मिलिट्री स्कूल मध्ये झाले. ते मराठी, इंग्लिश, हिंदी साहित्याचे अभ्यासक आहेत. जगभरात नावाजलेली असंख्य पुस्तके त्यांनी वाचून काढलीत.
ते जेव्हा बोलत रहातात, तेव्हा नुसत ऐकत राहवे वाटते. कोणताही विषय असूदेत, त्याची सखोल माहीती, त्या विषयीची नेमकी समज,अर्थकारण, राजकारण,आरोग्य, शेती अशा विविध विषयांवर ते टाॅप टू बाॅटम बोलत राहतात.
त्यांच्या मातुश्रीच्या नगर परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर, पवारांच्या राजकारणाला पूर्ण विराम मिळाला, अशी चर्चा झाली. परंतू त्यांनी आईचा पराभव पचवला. समंजसपणा दाखवला, थोडा ही तोल जाऊ दिला नाही. मनात कटूतेचा कसलाही अंश न ठेवता, ते चालते झाले. खरच, हे अनाकलनीय आहे. इतका भलेपणा असलेला राजकारणी, समाजकारणी युवा नेता लोकांनी पाहिला आणि पून्हा नवी उमेद देऊ उभा केला. राजकारणात सूड घेणे असते. त्याचा पदोपदी अनुभव आलेली माणस तुम्ही आम्ही पाहिली आहेत. बाळराजे पवार अपवाद राहीलेत. त्या पलीकडी जाऊन, सर्व समावेशक अशी प्रतिमा त्यांनी निर्माण केली. त्यांच्यातला “कुल राजकारणी” पाहून अनेकांना नवल वाटते. त्यांच्या आईचा पराभव, नाही म्हणल तरी पवार कुटुंबाला धक्काच होता. अशा कठीण काळात ही, ते फिनिक्स पक्षा सारखे, पुन्हा उभे राहीले. 2001- 02 सालच्या नप चे सार्वत्रिक निवडणूक निकालानंतर पाटील घराण, या पुढे नावालाच राहील ; अशी अटकल लावली गेली. ते खरे ही वाटायचे. त्यांच्या भोवती अनेक गतिरोध होते. लोकांनी नाकारले आहेच. तेव्हा, विरोधी बाकावर बसून जेवढ करता येईल तेवढे करू नसता, शांत बसू. एवढी एकच गोष्ट त्यांनी लक्षात ठेवली. तो अतिशय कठीण काळ होता. काळा बरोबर अनेकांनी पाठ दाखवली. काहीनी वाटा बदलल्या. मात्र, जीवाभावाच्या माणसांनी दुरून का होईना, स्नेह ठेवला. त्यामुळेच त्यांचा आत्मविश्वास कायम राहीला. काय असत की, सगळच कधी संपत नसत. जगाच्या नकाशात अवकाश असतो. एक पेस असतोच असतो. कुठे तरी एखादी पोकळी असतेच, तिला शोधायचा प्रयत्न तुम्ही करत राहीलात ना, संधी येते आपोआप. जेष्ठ लेखक उत्तम कांबळे व्याख्यानात नेहमी सांगत, काहींना उघडी दारे सुद्धा बंद दिसू लागतात, अशा वेळी आपण संपलोय, असे जेव्हा वाटायला लागते तेव्हा आपण स्वत:चे अस्तित्व विसरतो. बाळराजे, या गोष्टीला अपवाद राहीले. डोळस पणा कायम ठेवला. एका बिंदूशी चिटकून राहून पेस शोधायचा प्रयत्न केला आणि त्यांना यश मिळाले. आदळआपट, थयथयाट केला नाही. संधीची वाट पाहीली. त्यांच्या नेतृत्वाखाली 58 नगरसेवक, 6 नगराध्यक्षांनी काम करण्याची संधी मिळाली. बेरोजगार तरूण कार्यकर्त्यांना व्यावसायिक मार्गदर्शन करून आधार दिला. गरीब जोडप्यांचे लग्न लावून दिले. एक ना अनेक किचकट विषय मार्गी लावलेत. त्यांची मध्यस्ती “सत्यम शिवम सुंदरम”, या वचनाला जागणारी राहीली आहे. जातीचे बांध त्यांनी कधी उभे-आडवे केले नाहीत. त्यांना कामाचा कंटाळाच येत नाही. संपर्कात आलेला माणूस सहजा सहजी तुटत नाही. ही त्यांची जमेची बाजू आणि हातोटी आहे. या संदर्भात असंख्य उदाहरणे आहेत. मुद्दे व्यवस्थित पटवून देण्यात त्यांचा हातखंडा आहे.
खर म्हणजे, माणसाला वलय प्राप्त झाले की, त्याची छबी आवडायला लागते. त्यांच्यातला युवा राजकारणी नव्या पिढीला खुणावत राहायचा. त्यांनी पुस्तके वाचलीत, त्यामुळे माणसे वाचता आलीत. त्यांच बोलण, चालण, एकूणच त्यांची लकब कमालीचा प्रभाव पाडणारी आहे. मानसशास्त्रात केश्मरने अशा बांधेसूध व्यक्तिमत्त्वावर भाष्य केले आहे. अशी माणसे, समाजसेवक म्हणून नावारूपास येतात, असे म्हटले आहे.
त्यांच्या विषयी समाजात कमालीचे प्रेम, वात्सल्य, सहानुभूतीपूर्वक आपुलकी होती. त्यांना ती दिसली. अहंकाराचा लवलेश नसलेली पवारांची नवी पिढी म्हणजे, दैवी गिफ्ट म्हणता येईल.
गेवराईकरांनी विश्वास दाखवला. त्याची इतिहास नोंद झाली आहे. केवळ दादांची प्रतिभा लक्षात घेऊन, नागरीकांनी नगर परिषदेचे “साम्राज्य” त्यांच्या हाती दिले. मतदारसंघातील जवळपास तिनशे गावांनी पवार घराण्यावर विश्वास ठेवून, आबासाहेबांना ( अँड. लक्ष्मण पवार ) आमदार केले. एकदा नव्हे दोनदा, या विजयाला दादांचा स्पर्श आहे. ही बाब सुद्धा अधोरेखित करणारी आहे. हा आधुनिक युगातला चमत्कार आहे.
मी , तरूण भारतचा वार्ताहर होतो. शहरात कार्यालय होते. मनात विचार यायचा, राजकारणाच्या मुख्य प्रवाहात बाळराजे येतील का ? अनेकांशी चर्चा व्हायची, दोन्ही बाजू ऐकायला मिळायच्या. आता, त्यावेळी न वाचलेला रान्डो आठवतो. तो अस म्हणतो, तुम्ही एखाद्या विषयी निरभ्र मनाने , काही तरी शुभ चिंतित असाल तर ते कधीना कधी पुढे येतेच. आपण निम्मित मात्र असतो. ते त्याचेच संचित असते. प्रारब्धाने ते त्यांच्या पुढ्यात येते. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात. उदाहरणार्थ, आबासाहेब आमदार होणं आणि सलग तिसऱ्यांदा नपची सत्ता मिळणे, या सगळ्या गोष्टीत “सिक्रेट” आहे. जे रान्डो ने लिहून ठेवले आहे. दादांच्या वाढदिवसानिमित्त खूप दिवसानी त्यांच्याशी बोलण्याचा योग आला. फोन करून विचारले तर ते म्हणाले, सुभाषराव…! या ना, मी वाट पहातो.
दादा सांगत होते, माझ शिक्षण पुण्यात झाल. बारावी पर्यंत शिवाजी मिलिट्री स्कूल मध्ये होतो. लक्ष्मण अण्णा आणि मी पुढे मागेच होतो. भावा पेक्षा, आमच्याले मैत्रीचे नाते खूप छान होते. जगाच्या पाठीवर असा भाऊ मी पाहीला नाही. तेव्हा आणि आजही तेच नात आहे. शहरात आल्यावर सामाजिक उपक्रमात भाग घ्यायचो. घरात राजकीय वातावरण होते. सामाजिक कार्यात रस वाटायचा. आमचा मोठा ग्रुप होता. युवक काँग्रेस च्या चळवळीत काम केले आहे.
खर तर , मला बंडखोर वृत्ती आवडते. चापुलसी कोणाचीही नको वाटते. लोकशाहीत लोकांनी आपले हक्क न सोडता, स्वाभिमान ठेवून जगावे. कोणत्याही परिस्थितीत झुकू नये, कधी मोडू नये आणि आपण गुलाम आहोत. या पद्धतीने वागू नये.
अहो, जेव्हा सार्वजनिक ठिकाणी जायचा योग यायचा. तिथे गेलो की कर्मचारीवर्ग कमालीचा वाकायचा. नाही नाही, हे मला अजिबात पटत नाही. का झुकता ? कशासाठी ? आदर करणे वेगळी गोष्ट आहे. ती अशा पध्दतीने कोणी करत असेल तर मला आवडत नाही. हे अनेकदा बोलून दाखवायचो.
म्हणून मग, मीच सुरूवात केली. रभ अट्टल महाविद्यालयात स्थानिक मंडळावर काम करत असताना, रेग्युलर वर्गावर भर दिला. विद्यार्थ्यांकडून व्यक होणाऱ्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. चांगल्या शिक्षकांना पाठींबा दिला. प्राचार्य गाढवे सर येथे कार्यरत होते. कमालीचे प्रमाणीक आणि शिस्तीचे होते. त्यांना काम करायला मोकळीक दिली. चांगल्या कामाला आडवे येणारी माणसे सरळ केली. महाविद्यालयात विकासाचा निधी कसा आणि कुठे खर्च करण्यास पूर्ण अधिकार दिले. आम्ही पाठीशी राहून मदत केली.
सुभषराव, हे पहा, मला गच्चाळ, कपटी आणि हेतू ठेवून राजकारण करायला नको वाटते. सूडाचे राजकारण करणाऱ्या लोकांची चीड येते. लोकशाही आहे. कुणाचीही मक्तेदारी नाही. जिथे जायचे तिथे लोकांना जावू दिले पाहीजे. या जगात कोणी मोठ नसतं. आपले अस्तित्व अचानक तयार होत नाही. ते तयार करता येते. खूप सिम्पल गोष्ट आहे. “त्याग” करता आला पाहीजे. लालसा मोठी वाईट गोष्ट आहे. तिच्या पासून दूर राहता आले कि, कोणीही मोठा होऊ शकतो. पवार – पंडीतच पाहीजे, ही मोनोपल्ली कशाला ?
तुमच्या समोरचे उदाहरण आहे. आमदार लक्ष्मण पवार स्वकर्तृत्वावर निवडून आले की नाही. त्यांची रेषा ओलांडून जाता येईल ना, कोणी अडवलय. सत्तेच्या मागे धावणारे फक्त पळत असतात. त्याने सत्ता मिळत नाही. लोक सत्ता देतात. पण, तुमचे व्हिजन, तुमची आयडोलाॅजी कशी आहे. कोणासाठी आहे. मग, जनता पाठीशी राहते.
विकासाची दृष्टी ठेवून काम करणारी माणसे नव्या पिढीला हवीच आहेत.
जनतेचे खायचे , त्यांच्याकडे गुलाम म्हणून पहाणारी माणसे या मातीत उभी राहणार नाहीत, एवढी एकच इच्छा असल्याचे बाळराजे यांनी सांगितले.
नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात विकास करता आला. अण्णाच्या माध्यमातून ग्रामीण भागात चांगली कामे झालीत. याचा आनंद आहे.
राजकारणात कटुता विसरता आली पाहीजे. पाठीशी येत नाही म्हणून एखाद्यालावर सुड उगविणे, या सारखे पातक आयुष्यात आम्ही कधी केले नाही. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे शहरात आले होते. त्यांनी पाठीवर कौतुकाची थाप मारून बळ दिल्याचा उल्लेख दादांनी करून कृतज्ञता व्यक्त केली.
दादा, विकासाला स्पर्श करणारी नवी दृष्टी तुम्ही तुमच्या कर्तृत्वावर निर्माण केली आहे. या अर्थाने, बाळराजे….! तुमच्या पावलांना प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. तिला जपा आणि वाढवा, त्यामध्ये तुमची स्वप्ने आहेत. जेष्ठांचा आशीर्वाद आणि नव युवकांच्या पाठिंब्यावर तुमच्या उराशी बांधलेली अनंत स्वप्न साकार होवोत, अशी मांगीरबाबाच्या चरणी प्रार्थना आहे.
एक शायर म्हणतो, कौन कहेता है, आस्मां मे छेद नही होता. एक पत्थर तो, तबीयत से उच्छालो यारो..! बाळराजे दादा, आपणास दीर्घायुष्य लाभो,आभाळभर शुभेच्छा…!
सुभाष सुतार ,गेवराई जि.बीड
( पत्रकार )






