गेवराई :बीड – गेवराई तालुक्यातील दलित – बहुजन समाजाच्या चळवळीत सक्रिय काम करणारे युवा नेते आमन सुतार यांना नगर परिषदेचे स्वीकृत सदस्य म्हणून काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणीनुसार मातंग समाजाच्या विविध संघटनेने केली असून, भारतीय जनता पक्षाचे नेते बाळराजे पवार हे आमन सुतार यांना न्याय देतील, अशी भावना समाजाने व्यक्त केली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या गेवराई नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले आहे. भाजपाचे युवा नेते आमन सुतार यांच्यावर प्रभाग क्रमांक आठची जबाबदारीवर देण्यात आली होती. नवनिर्वाचित नगरसेवक शहेदाद भाई , तसेच ज्येष्ठ पत्रकार सुभाष सुतार यांची कन्या सोनाली सुतार यांना निवडून आणण्यात, त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.
आमन सुतार यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गेवराई तालुक्यातील दलित – बहुजन चळवळीत सक्रिय काम केले आहे. गेवराई शहरात त्यांचे चांगले युवा संघटन असून, सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. पक्षीय पातळीवरचे विविध कार्यक्रम,
महापुरुषांचा जयंती उत्सव, रक्तदाब शिबिर, शालेय उपक्रमाच्या माध्यमातून आमन सुतार यांनी चांगले काम केलेले असून, तालुक्यातील दलित – बहुजन समाजाच्या चळवळीत सक्रिय काम करणारे युवा नेते आमन सुतार यांना नगर परिषदेचे स्वीकृत सदस्य म्हणून काम करण्याची संधी द्यावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.





