खा.पाटील ,महंत शिवाजी महाराज, जरांगे पाटलाच्या हस्ते होणार उद्घाटन
गेवराई – बीड : मराठवाड्यातील शेतकर्यांना तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने गेल्या 16 वर्षांपासून किसान कृषि विकास प्रतिष्ठानच्या वतीने स्वर्गीय कृषिरत्न गणेशराव बेदरे स्मृतिप्रीत्यर्थ या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक 03 ते 07 जानेवारी दरम्यान किसान कृषी महोत्सव या कृषि प्रदर्शनात द्वारे बीड रोड वरील आठ एकर विस्तारणीय दसरा मैदानात उदया होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उदघाटन सोहळास उपस्थिती राहण्याचे आव्हान आयोजन समितीचे मुख्य संयोजक महेश बेदरे, स्वागताध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, कार्याध्यक्ष भाऊसाहेब शिंदे , पुरस्कार समिती प्रमुख राजेंद्र आतकरे मुख्य संयोजक महेश बेदरे यांनी केले आहे.
मराठवाड्यातील शेतकर्यांना नवतंत्रज्ञान मिळावे म्हणून येथील किसान कृषी विकास प्रतिष्ठान वतीने स्वर्गीय कृषिरत्न गणेश बेद्रे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रदर्शनाचे आयोजन केले असून प्रकल्प संचालक आत्मा, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी, महाएपीएसी फेडरेशन यांचा विशेष सहभाग या प्रदर्शनात असणार आहे.
कृषी प्रदर्शनात भव्य अशा आठ दालनात तब्बल २०० कृषी उत्पादनांची स्टॉल यामध्ये असून कृषी अवजारांची प्रात्यक्षिके या प्रदर्शनात पाहण्यास मिळणार आहेत. आज दि 3 जानेवारी शुक्रवार रोजी दुपारी 1:00 वा. राज्य सभेच्या खासदार रजनीताई अशोकराव पाटील, मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. तर प्रमुख अतिथी म्हणून श्री क्षेत्र नारायण गडाचे मठाधिपती शिवाजी महाराज, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख गेवराई चे लोकप्रिय आमदार विजयसिंह पंडित, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी चे कुलगुरू डॉ ईद्रमणी यांची विशेष उपस्थिती असणार , प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, राष्ट्रवादीचे नेते राजेसाहेब देशमुख,गेवराई चे तहसीलदार संदीप खोमणे,पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर , तालुका कृषी अधिकारी वडकुते, आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.