बीड :
संतोष देशमुख खून खटला बाहेरच्या जिल्ह्य़ात चालवा आणि संपूर्ण बीड पोलीस खाते बरखास्त करून, नवीन नियुक्त्या जाहिर कराव्यात अशी मागणी शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी केली आहे.
दरम्यान, आमदार सुरेश धस यांना देशमुख प्रकणारचे खरच गांभीर्य असेल तर, त्यांनी पुढे येऊन नेतृत्व करावे, आम्ही सगळे सोबत आहोत. मात्र, ते खर बोलतात आणि रेट्टा आला की, माघार घेतात, असे निरिक्षण ही खा. राऊत यांनी यावेळी नोंदविले आहे. सरकार आणि पोलिस संतोष देशमुख हत्या प्रकरणात नुसता देखावा तयार करून, चौकशीचा खोटा फार्स करीत असल्याचा आरोप केला. उप मुख्यमंत्री अजित पवार यांना आता पुरावा लागतो का, आम्हाला जेल मध्ये टाकले तेव्हा कोणता पुरावा होता ? असा सवाल उपस्थित करून, राऊत यांनी अपघाती नेता म्हणून पवारांवर टिका केली. ते नेते असते तर, बीड प्रकरणात एवढे आरोप झाल्यावर ही ते गप्पच आहेत. ते हतबल आहेत. त्यामुळे, ते पुराव्याची भाषा करताहेत. वास्तविक पाहता, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अधिकारात थेट कारवाईच करायला हवा होती. लोकांच्या मुडदे पडताहेत, दहशत सुरू आहे. तरीही, सरकार कागदी घोडे नाचवतय, पुरावा शोधायचे नाटक करतय,असा गंभीर आरोप ही खा. संजय राऊत यांनी मंगळवार ता. 7 रोजी सकाळी दहा वाजता आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. दरम्यान, नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक काॅवत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर देशमुख खून प्रकरणातील जवळपास सगळे आरोपी अटक झालेत. एक आरोपी फरार आहे.