मुंबई : शरद पवार यांच्या गटाकडे असलेले काही खासदार [ 8 पैकी 7 ] आणि आमदार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उड्या मारायाच्या तयारीत असल्याची सनसनाटी बातमी आहे. या बातमीने राजकीय पटलावर खळबळ उडवून दिली आहे. खरच, फाटाफुटीचा बाका प्रसंग उभा राहीला तर काय करायचे ? असा यक्ष प्रश्न शरद पवार यांच्या पुढे पून्हा उभा राहील. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनिल तटकरे [ दादा गट ] यांनी या चर्चेला दुजोरा दिला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया दुहान यांनी मध्यस्थी केल्याची चर्चा आहे. त्या सध्या काँग्रेस पक्षात आहेत.
कधी काळी दिल्ली च्या खूर्चीला आव्हान देणारे, तेल लावलेले पहिलवान ज्येष्ठ नेते शरद पवार हे ,अजित दादां पुढे हतबल झाल्याची चर्चा दिल्लीत आहे. दादा, राज्य सरकार चे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना दिल्लीश्वरांचा आशीर्वाद आहे. राज्य आणि केन्द्राची सत्ता ताब्यात असल्याने शरद पवारांच्या खासदारांना विनंती वजा फर्मान सोडून, माझ्या सोबत या, असा निरोप पाठवला असल्याची चर्चा बुधवारी. ता. 8 रोजी दिल्लीतून महाराष्ट्रात येऊन धडकली आहे. शेवट गोड व्हावा, अशी राजकीय नेत्यांची अपेक्षा असते. मात्र, काहींच्या वाटेवर, शेवटच्या घडीला काटेच येतात. याचा अनुभव सध्या शरदचंद्र पवारांना येतो आहे. काँग्रेस सोडून स्वतःचा पक्ष स्थापन करून त्या पक्षाला मूर्त स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी ज्यांना खस्ता खाल्या, पक्ष वाढवला. त्याच पक्षात अपमान सहन करायची वेळ आली. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष होते. मागच्या सहा महिन्यात पक्ष फुटला. घरातूनच पवारांना विरोध झाला. पुतणे अजित पवार यांनी अचानक बंड करून अख्खा पक्ष ताब्यात घेतला. मागच्या विधानसभेच्या [ 2024 ] निवडणुकीत अजित पवार गटाचे [ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ]
सर्वाधिक आमदार निवडून आलेत. मुळ पक्ष कोणाचा, या संदर्भात कोर्ट केस सुरू आहे. खा. सुप्रियाताई सुळे- पवार यांनी पक्ष तोडफोडी विषयी नाराजी व्यक्त केली असल्याचे निरिक्षण राजकीय जाणकारांनी मांडले आहे. चर्चेला उधाण आले असताना, अजित दादा दिल्लीत आहेत. दरम्यान, शरद पवार यांच्या पक्षातील खासदार फुटून दादा गटात गेल्यास, शरदचंद्र पवारांना मोठा धक्का बसेल, अशी चर्चा होऊ लागली आहे.