मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चांगली कामगिरी केली म्हणून, महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आले. अशी कौतुकाची थाप ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष [ शरद पवार गट ] शरद पवार यांनी, संघाने निभावलेल्या कामगिरीवर मारल्याने महाराष्ट्रातील राजकारण्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. शरद पवार यांच्या मनात नेमके काय चाललय, अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीत दारूण पराभव हाती आलेल्या भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभेत कमबॅक करता आले. विधानसभेत विजय मिळवून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी आले. एकनाथ शिंदे अजित दादा यांना उप मुख्यमंत्री मिळाले. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस च्या पदरी निराशाच आली. तिघांना मिळून पन्नास जागा ही आणता आल्या नाहीत. शरद पवार यांच्यावर अजित दादांनी मात केली आहे. त्यातच, आता शरद पवार यांनी संघाचे कौतुक केले आहे. गुरूवार ता. 9 रोजी झालेल्या एका कार्यक्रमात पवार यांनी संघा विषयी कौतुकास्पद शब्द वापरून, विधानसभेत झालेल्या यशात त्यांचा मोठा वाटा असल्याचे निरिक्षण नोंदविले आहे.