सर्व सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यामुळे, उद्याच्या नगर पालिका, महापालिका सार्वत्रिक निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. आमचा निर्णय झाला आहे. मुंबई ते नागपूर पर्यंतच्या सर्व निवडणुका शिवसेना [ उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ] स्वतंत्र निवडणुक लढविणार आहोत. एकदा, आम्हाला आमचे अस्तित्व अजमावून पाहायचे आहे. शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तसे संकेत दिले आहेत. अशी थेट भूमिका खा. संजय राऊत यांनी मांडल्याने महा विकास आघाडीत बिघाड झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. विशेष बाब म्हणजे, स्वतंत्र भूमिका जाहीर करायच्या आधी, आघाडी धर्म म्हणून शिवसेनेने कोणाशीही कसल्याही बाबतीत चर्चा न करता स्वबळाचा निर्णय जाहीर केला. काय व्हायचे तर होऊ दे, पण आम्ही एकला चलो च्या भूमिकेतून पुढे जायचा निर्णय घेतला आहे. अशी पुष्टी खा. राऊत यांनी जोडली आहे.
लोकसभा-विधानसभा निवडणुकीत महाआघाडीतील प्रमुख घटक पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार [ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ] , काँग्रेस पक्ष , आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांची मोठी भूमिका होती. लोकसभेत जबरदस्त यशा मिळाले. मात्र, विधानसभेत सुपडासाफ झाला. २८८ जागे पैकी ५० विधानसभा मतदारसंघ सुद्धा काबीज करता आले नाहीत. जवळपास तिघांच्या पदरी निराशा आली. सर्वाधिक नुकसान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झाले. हे वास्तव आहे.ठाकरेंचा डोंळा मुंबई वर आहे. अनेक वर्षांपासून मुंबई महापालिका ताब्यात आहे. भाजपा सोबत होता म्हणून लढाई सोपी होती. भाजपा ने मुंबई मध्ये कधी ढवळाढवळ केली नाही. हां, एक मात्र दक्षता घेतली. ती म्हणजे, मुंबई शहरात भाजपाला वाढविले. वार्डात जनाधार तयार करून स्वतःची ओळख निर्माण केली. भाजपा स्वबळावर निवडणूक जिंकून मुंबई वर भाजपाचा झेंडा फडकवण्याच्या तयारीत आहे. वातावरण तयार करून ठेवलय, देवेंद्र फडणवीस सारखा, सुसंस्कृत मास लीडर भाजपा कडे आहे. शिवसेनेच्या हातून मुंबई गेली तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच अडचणीत येईल. उरले सुरले नेते शिवसेनेत राहतील की नाही,अशी स्थिती तयार होईल, या भितीने उद्धव ठाकरे गट अस्वस्थ आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टिका करणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गट कमालीचा पाॅझिटिव झाल्याचे चित्र आहे. फडणवीस यांची स्वत: उद्धव ठाकरे, शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे आणि उर्वरित शिवसेना नेत्यांनी अनेकदा भेटी गाठी घेतल्या आहेत. त्यामुळे, घटस्फोट झालेले दोन पक्ष एकत्र येतात की काय ? असा प्रश्न राजकीय पटलावर चर्चेला आला आहे.उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर झाली. त्यांचे मित्र पक्ष ही स्वतंत्र लढायला तयार आहेत. परंतु , शिवसेनेने आधी चर्चा करायला हवी होती. अशी भूमिका मांडून, त्यांचा निर्णय त्यांनी घेतला तर आमचा विरोध असण्याचे कारण नाही. शरद पवार गटाची आणि काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट झाली आहे. ते तयार आहेत तर आम्ही सुद्धा वेगळे लढू , काँग्रेस आणि शरद पवार यांचा पक्षाची युती राहील. असा विचार दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी बोलून दाखवली.भाजपा नको म्हणून, एकत्र आलेली महा विकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर आहे. भाजपाला लोकसभेत फटका बसला मात्र, विधानसभेत त्यांचे कमबॅक झाले. दिल्लीत सत्ता आता महाराष्ट्र ही काबीज केला आहे. सोबत आहेत अजित दादा आणि एकनाथराव शिंदे यांची शिवसेना. त्यामुळे, महानगर पालिका निवडणुकीत महायुती अभेद राहील, असे चित्र आहे. तसे झाल्यास, शिवसेनेच्या हातून मुंबई जाणार का ? हा कळीचा मुद्दा आहे.