बीड –
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांचे संघटन कौशल्य, उपक्रमशीलता लक्षात घेऊन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे यांच्या सूचनेनुसार पत्रकार वैभव विवेक स्वामी यांना नवी जबाबदारी देण्यात आली असून, त्यांची प्रदेश संपर्क प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी अधिकृत घोषणा केली आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे मागील दहा वर्षापासून बीड जिल्हाध्यक्ष त्याचबरोबर मागील पाच वर्षापासून मराठवाडा विभागीय अध्यक्ष पद सांभाळत असताना वैभव स्वामी यांनी विविध उपक्रमशील उपक्रम राबवून पत्रकार संघाचे नाव उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्याचबरोबर संघटन कौशल्य वापरून पत्रकार संघाचे सभासद, पदाधिकारी जोडण्याचे काम मराठवाडास्तरावर प्रामुख्याने केले. यामुळे त्यांना पत्रकार संघाने त्यांना राज्यस्तरीय उपक्रमशील अध्यक्ष म्हणून तीन वेळा राज्यस्तरीय मेळाव्यामध्ये पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊनच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे संस्थापक संघटक संजय भोकरे यांच्या आदेशानुसार पत्रकार संघाच्या राज्य कार्यकारिणीने पत्रकार संघाचे ध्येयधोरण आणि संघटना वाढीसाठी ग्रामीण व शहरी पत्रकारांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी त्यांच्यावर प्रदेश संपर्कप्रमुख या राज्यस्तरावरील मानाच्या आणि सन्मानाच्या पदावर संधी दिल्याने त्यांचे मराठवाड्यासह राज्यस्तरातून अभिनंदन होत आहे.